मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या, रविवारी मध्य, हार्बर, पश्चिम मार्गावर रविवारी दिवसा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. कर्जत यार्ड सुधारणेसाठी शनिवार आणि रविवारी सुमारे दीड तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकवेळेत नेरळ ते खोपोली दरम्यान लोकल धावणार नाही.
स्थानक – भिवपुरी रोड ते पळसदरी
वेळ – सकाळी १०.४५ ते दुपारी १२.१५
परिणाम – शनिवारी सकाळी ९.०१, ९.३० आणि ९.५७ ला सुटणारी सीएसएमटी-कर्जत कर्जत लोकल नेरळपर्यंत धावणार आहे. सकाळी १०.४५, ११.१९ आणि दुपारी १२ची कर्जत-सीएसएमटी लोकल नेरळ स्थानकातून चालवण्यात येईल. स. १०.४०, दु. १२ची कर्जत-खोपोली आणि स. ११.२०, दु. १२.४० खोपोली-कर्जत लोकल रद्द करण्यात आली आहे.
कर्जत यार्ड सुधारणा (रविवार)
स्थानक – भिवपुरी रोड ते पळसदरी
वेळ – सकाळी ११.२० ते दुपारी १२.२०
परिणाम – रविवारी सकाळी ९.३०, ९.५७ वाजता सुटणारी सीएसएमटी-कर्जत लोकल नेरळपर्यंत धावणार आहे. सकाळी ११.१९ आणि दुपारी १२ची कर्जत-सीएसएमटी लोकल नेरळ स्थानकातून चालवण्यात येईल. दुपारी १२ची कर्जत-खोपोली आणि सकाळी ११.२० खोपोली-कर्जत लोकल रद्द करण्यात आली आहे.