विद्यार्थिनी मेसवरून मेडिकल दुकानात गेली. तिकडे तीन जण होते. याशिवाय काही ग्राहक बाहेर उभे होते. तरुणीनं औषध घेतलं. दुकानदारानं मोबाईल नंबर देण्यास सांगितलं. त्यामुळे तरुणीनं नंबर दिला आणि हॉस्टेलला परतली. यानंतर संध्याकाळी ७ वाजून ३३ मिनिटांनी तिला व्हॉट्स ऍपवर एका अनोळखी नंबरवरून एका पाठोपाठ एक मेसेज आले. यू आर सो क्यूट, मला तू आवडतेस, असं समोरच्या व्यक्तीनं मेसेजमध्ये म्हटलं होतं.
तुम्ही कोण आहात, अशी विचारणा तरुणीनं केली. त्यावर मी कोण आहे ते सांगितलं तर तू कोणाला सांगणार तर नाहीस ना? असा प्रश्न केला. मुलीनं हो असं उत्तर दिल्यावर समोरील व्यक्तीनं कॉल रिसीव्ह करण्यास सांगितलं. आपण मेडिकल दुकानात काम करत असल्याचं त्यानं सांगितलं.
तरुणीनं ही गोष्ट कोचिंग फॅकल्टी आणि हॉस्टेलमधील इतर विद्यार्थ्यांच्या कानावर घातली. ‘मी माझ्या घरापासून दूर राहतेय. या घटनेमुळे मला खूप असुरक्षित वाटू लागलंय. माझा मोबाईल नंबर अज्ञात व्यक्तीकडे कसा गेला? मेडिकल दुकानात माझ्या नावानं कार्ड तयार केलं होतं. तिकडे मी नंबर दिला होता. ४ डिसेंबरला माझा पेपर आहे. मला सुरक्षेचा प्रश्न सतावतोय,’ अशा शब्दांत तरुणीनं चिंता व्यक्त केली.
तरुणीनं तिची व्यथा व्हिडीओच्या माध्यमातून मांडली. तिच्या व्हिडीओची दखल घेत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. त्याचं नाव फरहान असल्याचं समजतं. पोलीस त्याची चौकशी करत आहेत.