म टा. प्रतिनिधी, जळगाव: जामनेर तालुक्यातील शेंगोळा या गावात गेल्या काही दिवसांपूर्वी शारिरीक व्याधीने त्रस्त असलेल्या एका तरुणीला औषधांचा गुण येत नव्हता. त्यामुळे एका मांत्रिकास बोलविण्यास आले होते. त्याच्या सूचनेनुसार तरुणीस उपचाराच्या नावाने तोंडात चप्पल घेवून फिरवल्याच्या धक्कादायक अघोरी प्रकार शनिवारी (दि.१८) घडल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहीती मिळाल्यानतंर महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पथकाने काल सोमावारी या तरुणीच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबियांचे प्रबोधन केले.

वाचाः

शेंगोळा येथील तरुणी ही काही शारिरीक व्याधींनी ग्रस्त होती. कुटुंबातील सदस्याकडून तिच्यावर अनेक औषध उपचार केले. पण गुण येत नाही म्हणून मुलीला भूतप्रेताची बाधा असल्याचं नजीकच्या नातेवाईकांनी परिवाराला सूचवले. नातेवाईकांनी दिलेल्या या सल्ल्यामुळं धास्तावलेल्या मुलीच्या वडिलांनी यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील मांत्रिकास बोलावले. मांत्रिकाने मुलीच्या तोंडात पायातील चप्पल धरायला लावून गावातून व गावाच्या आजूबाजूच्या फिरवले. मांत्रिकाने मुलीच्या अंगात सहा भूत-प्रेत असल्याचं सांगून त्यातील ४ भूत-प्रेतांना काढण्यात आलं असल्याचं मुलीच्या घरच्यांना सांगितलं व पिडीत मुलीच्या परिवाराकडून भरमसाठ रक्कम उकळली.

वाचाः

अंनिसच्या पथकाने केले प्रबोधन

मुलीवरील पुढील उपचार अजून बाकी आहे. त्यासाठी पुन्हा येणार असल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कार्याध्यक्ष प्रल्हाद बोहाडे व जिल्हा प्रधान सचिव अशोक तायडे यांना मिळाल्यानंतर जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डिगंबर कट्यारे याच्या सूचनेनुसार शेंगोळा येथे जाऊन पिडित कुटुंबाची भेट घेतली. या पुढे मांत्रिकाकडून अघोरी उपचार करून घेवू नका, असा सल्ला देत कुटुंबियांची समजूत देखील त्यांनी काढली. तसेच वैद्यकीय उपचार चालू ठेवण्याचा सल्ला दिला आहे. योग्य वेळी अघोरी उपचारला आळा बसल्यामुळे ग्रामस्थांनी अंधश्रद्धा समिती कार्यकर्त्यांचे आभार मानले. या कामात गावाचे पोलीस पाटील जब्बार तडवी व भीमराव दाभाडे यांनी सहकार्य केले.

मांत्रिकावर कारवाई करा
यापुढे कोणत्याही अंधश्रद्धेला थारा देऊ नका, मांत्रिकाला बोलावू नका, पोलिसांनी मंत्रिकांविरुद्ध शोध मोहीम राबवून त्यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा प्रधान सचिव अशोक तायडे यांनी केले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here