चेन्नई: भरधाव वेगातील दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. दुचाकी ११४ किमी प्रती तास वेगानं पळवत असताना अचानक मध्ये वाहन आलं. त्यामुळे दुचाकीस्वारानं दुचाकी उजव्या बाजूला वळवली. त्यानंतर ती दुभाजकाला आदळली. या अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ १ डिसेंबरला व्हायरल झाला.

चेन्नईच्या तारामणी परिसरात २९ नोव्हेंबरला भीषण अपघात झाला. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं दोन तरुण मृत्यूमुखी पडले. प्रवीण (१९) आणि हरी (१७) अशी दोन तरुणांची नावं आहेत. तारामणी परिसरात असलेल्या १०० फुटी रस्त्यावर दुचाकी चालवत असताना अपघात झाला. प्रवीण महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकत होता. तर हरी नुकताच बारावी उत्तीर्ण झाला आहे.
स्वत: चाली रचतोय, स्वत:च हाणून पाडतोय! जेलमध्ये आफताबचा ‘भलताच खेळ’; पोलिसांना वेगळीच भीती
व्हायरल झालेला व्हिडीओ प्रवीण आणि हरीनं रेकॉर्ड केलेला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीच्या २० सेकंदांमध्ये वेग पकडून सुसाट चालणारी दुचाकी दिसते. स्पीडोमीटरील आकडे झपाझप वेगानं वाढत जातात. २० सेकंदांत दुचाकी ११४ प्रती तास वेगानं पळू लागते. तितक्यात समोर एक मिनी व्हॅन येते. मिनी व्हॅनला दुचाकी धडकू नये यासाठी प्रवीण दुचाकी उजवीकडे वळवतो. दुचाकी दुभाजकाला धडकते. यानंतर आसपास गर्दी जमते. पोलीस घटनास्थळी येतात.

दुर्घटनेचा संपूर्ण व्हिडीओ चालकाच्या हेल्मेटला असणाऱ्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण आणि हरी स्पोर्ट्स बाईक चालवत होते. या दुचाकीचा वेग १३० किमी प्रती तासापर्यंत जाऊ शकतो. प्रवीणच्या पालकांनी काही महिन्यांपूर्वीच त्याला नवी दुचाकी घेऊन दिली. त्याला अद्याप परवानादेखील मिळाला नव्हता. प्रवीण दुचाकी चालवत असताना हरी मागे बसला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here