मुंबई: जगातील सुमारे २५ देशांमध्ये व्यवसाय करणारी जागतिक उत्पादक कंपनी युनिपार्ट्स इंडियाच्या आयपीओला शेवटच्या दिवशी २५.३२ पट सदस्यत्व (सब्स्क्रिप्शन) मिळाले. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (एनएसई) आकडेवारीनुसार, आयपीओ अंतर्गत १,०१,३७,३६० समभागांच्या ऑफरच्या तुलनेत २५,६६,२९,१७५ समभागांसाठी बोली लावण्यात आली. पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIB) श्रेणी ६७.१४ पट सबस्क्राईब झाले. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांची श्रेणी १७.८६ पट आणि किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांची श्रेणीची ४.६१ पट सदस्यता घेतली गेली.

ग्रे मार्केट प्रीमियम
युनिपार्ट्स इंडियाचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये १० टक्क्यांपेक्षा जास्त वर दिसत आहेत. आयपीओ वॉचनुसार, युनिपार्ट्स इंडियाचा ग्रे मार्केट प्रीमियम ६० रुपये आहे, जो त्याच्या जारी किमतीपेक्षा ११ टक्के जास्त आहे. आणि या आयपीओच्या ग्रे मार्केट प्रीमियममध्ये आणखी वाढ होऊ शकते, असे तज्ञांचे मत आहे. कंपनीचे शेअर्स सोमवार, १२ डिसेंबर २०२२ रोजी बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध होण्याचे अपेक्षित असून शेअर्सचे वाटप ७ डिसेंबरला होऊ शकते.

रेल्वे सुपरफास्ट धावणार, महिन्याभरात शेअर्समध्ये आली जबरदस्त तेजी! गुंतवणुकपूर्वी जाणून घ्या
प्राईस बँड किती होती
युनिपार्ट्स इंडियाचा ८३६ कोटी रुपयांचा इश्यू ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुला होता. विक्रीसाठी पूर्णपणे ऑफर केलेल्या आयपीओसाठी ५४८ ते ५७७ रुपये हा प्राईस बँड निश्चित करण्यात आला होता. तसेच आयपीओची लॉट साइज २५ शेअर्स होती. हा इश्यू २९ नोव्हेंबर रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला झाला.

गुंतवणूकदारांना मंदीतही संधी! टायर कंपनीच्या शेअरने पकडला रॉकेट स्पीड, ५ महिन्यात किंमत दुप्पट
किती किमतीवर सूचिबद्ध होईल?

युनिपार्ट्स इंडियाच्या आयपीओची लिस्टिंग ६०० रुपयांच्या पुढे जाऊ शकते, असा अंदाज लावला जात आहे. सध्या त्याचा ग्रे मार्केट प्रीमियम रु. ६० आहे. यानुसार (५७७+६०=६३७) युनिपार्ट्स इंडियाची सूची ६३७ रुपयात होऊ शकते म्हणजेच पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना सुमारे रु. ३७ चा नफा मिळेल. परंतु गुंतवणूकदारांनी कोणत्याही आयपीओबद्दल ठाम मत तयार करण्यासाठी ग्रे मार्केट प्रीमियमकडे पाहू नये, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

पैसे तयार ठेवा! आणखी २ IPO ना सेबीचा हिरवा कंदील, घ्या जाणून संपूर्ण तपशील
अँकर गुंतवणूकदारांकडून इतके कोटी रुपये जमवले
अँकर गुंतवणूकदारांकडून २५१ कोटी रुपये उभे केले आहेत, असे युनिपार्ट्स इंडियाने सांगितले. कंपनीने प्रति समभाग ५७७ रुपये दराने अँकर गुंतवणूकदारांना ४३.४४ लाख इक्विटी शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. नोमुरा, मॉर्गन स्टॅनले, बीएनपी परिबा, HDFC म्युच्युअल फंड, आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड, इन्वेस्को म्युच्युअल फंड, महिंद्रा म्युच्युअल फंड, कार्नेलियन कॅपिटल, बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी आणि बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी, हे अँकर गुंतवणूकदार आहेत. युनिपार्ट्स इंडिया ही अभियांत्रिकी प्रणाली आणि उपायांची जागतिक उत्पादक असून त्यांचा व्यावसायिक नेटवर्क २५ देशांमध्ये पसरलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here