railway commuter dies after iron rod pierces through his neck: दिल्लीहून निघालेली निलांचल एक्स्प्रेस लखनऊसाठी रवाना झाली. सकाळी ९ ते १०.३० दरम्यान अलिगढजवळ ब्लॉक घेण्यात येणार होता. मात्र ८.३५ पासूनच काम सुरू करण्यात आलं. मजूर आणि कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा हरिकेश यांच्या जीवावर बेतला. हरिकेश यांच्या मृत्यूनं दोन मुलांचं पितृछत्र हरपलं आहे.

बहिणीच्या लग्नासाठी हरिकेश लखनऊला चालले होते. त्यांच्या घरी वाढदिवसाची तयारी सुरू होती. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. ३२ वर्षांच्या हरिकेश यांचा रेल्वे प्रवासादरम्यान मृत्यू झाला. डावर स्टेशनजवळ रुळांवर काम सुरू होतं. सकाळी ९ वाजता काम सुरू होणं अपेक्षित होतं. मात्र ते २५ मिनिटं आधीच सुरू झालं. त्याचवेळी तिथून निलांचल एक्स्प्रेस जाऊ लागली. रुळांशेजारी असणारी ५ फुटांची सळई अचानक हवेत उडाली. खिडकीची काच फोडून हरिकेश यांच्या गळ्यातून आरपार गेली.
हरिकेश यांनी खिशात हात घातला होता. तो हात बाहेर काढण्याआधीच खिडकी फोडून आत आलेली सळई त्यांच्या मानेतून आरपार गेली होती. अवघ्या काही क्षणांमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. झालेली घटना पाहून आसपासच्या प्रवाशांना धक्का बसला. जनरल डब्याच्या सीट नंबर १५ वर हरिकेश यांचा निष्प्राण देह होता. त्यांच्या आसनाजवळ रक्त सांडलं होतं.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.