म. टा. प्रतिनिधी, पुणेः ‘, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे सुमारे ६४ टक्के असून, मृत्यूदर हा सुमारे २.०६ टक्के आहे. रुग्णसंख्या वाढत असली, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे कायम असून, मृत्यूदर हा राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे’ असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. ()

चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्यामुळे जिल्ह्यात रुग्णसंख्या ही वाढलेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राम म्हणाले, ‘सध्या पुणे व परिसरामध्ये १७ हजार ५४ करोनाबाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. चाचण्यांची संख्या वाढविण्यात आल्याने रुग्णांची संख्याही वाढली आहे. मात्र, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६४ टक्के असून, हे प्रमाण कायम आहे.

‘सध्या पुण्यातील मृत्यूदर २.०६ टक्के आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मृत्यूदर १.७ टक्के, तर ग्रामीण भागामध्ये १.६ टक्के आहे. आगामी काळात पुण्याचा मृत्यूदर एक टक्क्यापेक्षा कमी करण्याचा प्रयत्न असणार आहे‘ असे राम यांनी स्पष्ट केले.

‘लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना घरी पाठविण्याच्या सूचना रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. घरी व्यवस्था नसलेल्या रुग्णांना करोना केअर सेंटरमध्ये पाठविले जाते. व्याधीग्रस्त आणि प्रकृती गंभीर असणाऱ्या रुग्णांवरच रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत’ असे राम यांनी सांगितले.

पुन्हा लॉकडाऊन नाही

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी चांगलं सहकार्य केल्यामुळं पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात येणार नाही, असं स्पष्टीकरण जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सोमवारी माध्यमांसोबत बोलताना दिलं. लॉकडाऊन वाढवला नसला तरी शासनाच्या नियमांचे पालन नागरिकांनी करावं लागणार असल्याचं, त्यांनी म्हटलं आहे.

महिनाअखेरीस मोठ्या प्रमाणात खाटा उपलब्ध होणार

करोनाबाधित रुग्णांवर वेळीच उपचार करणे आणि खाटांची उपलब्धता होण्यासाठी शहरातील काही खासगी रुग्णालये ही शंभर टक्के कोविड रुग्णालये, तर काही रुग्णालये ही नॉन कोविड रुग्णालये म्हणून जाहीर केली जाणार आहेत. त्यामुळे या महिन्याअखेरीस मोठ्या प्रमाणात खाटा उपलब्ध होऊ शकणार आहेत; तसेच ससूनसह इनलॅक्स बुधरानी, ज्युपिटर आणि दळवी हॉस्पिटलमध्ये आणखी अतिदक्षता खाटा (आयसीयू बेड्स) आणि व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे’ असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

‘करोनाबाधित रुग्णांवर वेळेवर उपचार होण्यासाठी खाटा उपलब्ध करण्यात येत आहेत. शहरातील काही खासगी रुग्णालये ही शंभर टक्के कोविड रुग्णालये म्हणून जाहीर करण्यात येणार आहेत. काही रुग्णालये ही नॉन कोविड रुग्णालये असणार आहेत. त्यामुळे या महिनाअखेरीस मोठ्या प्रमाणात खाटा उपलब्ध होणार आहेत’ असंही ते म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here