रायगड : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाची महाराज यांचा अवमान केल्याने खासदार उदयनराजे भोसले यांनी कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी सर्व पक्षांच्या पुढ्याऱ्यांना देखील फैलावर घेतलं. “शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर पांघरून घालताना लाज वाटू द्या. लाज वाटत नाही या लोकांना, महाराजांचं नाव घेताना गर्वाने घेतात आणि स्वार्थ साधला गेल्यानंतर जेव्हा अवमान होतो त्यावेळी एकही व्यक्ती धारिष्ठ दाखवत नाही. नितीमत्ता कुठे गेली यांची, का ठामपणे मत व्यक्त करत नाहीत, असा सवाल करत उदयनराजे भोसले सत्ताधाऱ्यांवर आणि विरोधकांवर चांगलेच संतापले.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वात आज किल्ले ‘रायगड’ येथे निर्धार शिवसन्मानाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थितांना संबोधताना खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. “छत्रपती शिवाची महाराज यांनी सगळ्यांना एकत्र घेऊन ‘स्वराज्य’ स्थापन केले. प्रत्येक जाती, धर्माचा सन्मान करण्याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. त्याच शिवरायांचा अपमान सुरू असल्याचे उदयनराजे यांनी म्हटले. राज्यपालांच्या वक्तव्यावर राज्यातील नेते शांत का बसलेत? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

प्रोटोकॉल बघून राज्यपालांना पाठीशी घालणार का? चूक ती चूकच! उदयनराजे संतापले

अनेक राजांचे राज्य त्या राजांच्या नावाने ओळखलं गेलं. पण आपल्या शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं राज्य म्हणून ओळखलं जातं. आज तीच रयत स्वार्थ पाहताना दिसत आहे. राजकीय स्वार्थ साधत आहे. त्यामुळेच महाराजांचा अवमान करण्याचं धाडस होत आहे. आपण पुढच्या पिढीला काय आदर्श देणार आहोत? प्रोटोकॉल बोलून राज्यपालांना का पाठीशी घालतात?, असा सवालही उदयनराजेंनी यावेळी केला. शिवरायांचा अवमान झाला तर मी गप्प बसणार नाही. अवमान करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आलीय, असं उदयराजे भोसले हे उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले.

प्रत्येक राजकीय पक्ष स्वार्थी झाला. पुढाऱ्यांनी जाती धर्मात तेढ निर्माण केली. देशाचे तीन तुकडे झाले आहेत. ३० तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. राजकारणातील स्वार्थ पाहून खेद वाटतो. शिवरायांनी निर्माण केलेलं राज्य हे शिवरायांचं राज्य म्हणून ओळखलं गेलं नाही. ते रयतेचं राज्य म्हणून ओळखलं गेलं. शिवरायांनी कधीच स्वार्थाचा विचार केला नाही, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

पत्नी, प्रियकर अन् पॉलिसी; मुंबईकर बिझनेसमनला स्लो पॉयझनने संपवलं, पोटात ४०० पट आर्सेनिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here