भंडारा: लग्न स्वागत सोहळ्यात पाहुणे मंडळींनीन दिलेल्या अन्नातून सुमारे २०० जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्याअंतर्गत असलेल्या सरांडी बूजरूक येथे उघडकीस आला आहे. विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. रात्री जेवण केल्यानंतर अनेकांना सकाळी पोटदुखी, उलटी, जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर रुग्णांवर खासगी रुग्णालयासह सरांडी बूजरूक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. अधिक दक्षता म्हणून आरोग्य विभागाचे पथक देखील गावात दाखल झाले आहे.

सरांडी येथील रहिवासी मदन नामदेवराव ठाकरे यांच्या मुलाचा विवाह सोहळा २९ नोव्हेंबरला पार पडला. त्यांनतर दुसऱ्या दिवशी ३० नोव्हेंबरला सरांडी येथे स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळच्या सुमारास या कार्यक्रमात किन्ही, सरांडीसह नजीकच्या गावातील पाहूण्यांनी हजेरी लावली. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी पोटदुखी, उलटी, जुलाबाचा त्रास जाणवू लागल्यामुळे अनेकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खासगी डॉक्टरांकडे धाव घेतली.

आरे कारशेडवरून बेजबाबदार ट्वीट केल्यानं सुमीत राघवनवर नेटकरी संतप्त, ‘तुम्ही सत्तेचे गुलाम’
रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रूग्णांचे उपचार केले. तसेच बाधित रुग्ण शोधण्यासाठी मोहीम राबविल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर ही घटना उघडकीस येताच गावातील जवळपास ७ विविध ठिकाणच्या पाण्याचे नमूने देखील तपासणीसाठी पाठवले आहेत. अन्नाचे व तेलाचे नमुने सुद्धा जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात परिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहेत. आशा वर्कर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून गावात सर्वेक्षण करण्यात आले आहे.

महाराजांचं नाव घेताना गर्वाने घेतात, स्वार्थ साधला गेल्यावर…; उदयनराजेंनी सत्ताधाऱ्यांना फटकारले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here