नवी दिल्ली: तुम्ही देखील HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बँक क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉइंट आणि फी स्ट्रक्चर बदलणार आहे, याबद्दल एचडीएफसी बँकेने आपल्या क्रेडिट कार्डधारकांना एसएमएस आणि ईमेल पाठवून माहिती दिली आहे. बँकेकडून नवीन बदल नव्या वर्षांपासून लागू केले जातील. बँकेने पाठवलेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०२३ पासून क्रेडिट कार्डचा रिवॉर्ड पॉइंट प्रोग्राम आणि फी स्ट्रक्चर बदलण्यात येत आहेत.

जबरदस्त! आरबीआयचा नवीन नियम, तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर एकदा वाचाच
HDFC बदल करणार
एचडीएफसी बँकेने पाठवलेल्या मेसेजनुसार, बँकेच्या थर्ड पार्टी मर्चंटद्वारे भाडे भरल्यावर आकारण्यात येणाऱ्या शुल्कात बदल करण्यात आला आहे. नवीन वर्षापासून बँकेने अशा पेमेंटसाठी व्यवहाराच्या एकूण रकमेवर १ टक्के शुल्क आकारणार आहे. ग्राहकांकडून हे शुल्क दुसऱ्या महिन्याच्या भाड्याच्या व्यवहारासह घेतले जाईल. बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही परदेशात एखाद्या दुकानात किंवा ऑनलाइन किंवा भारतातील अशा ठिकाणीही भारतीय रुपयांमध्ये पेमेंट केले, ज्याचा व्यापारी परदेशात लिंक झाला असेल, तर अशा ठिकाणी तुमच्याकडून १ टक्के शुल्क घेतले जाईल. याशिवाय बँकेने क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट सिस्टममध्येही बदल केला आहे.

Credit Card ने OTP शिवाय पैसे काढता येतात?, सुरक्षित राहण्यासाठी या टिप्स फॉलो करा
रिवॉर्ड प्रणाली बदलणार
नवीन वर्षापासून क्रेडिट कार्ड रिवॉर्ड सिस्टीममध्ये बदल करण्याच्या देखील बँक तयारीत आहे. आता ग्राहकांसाठी वेगवेगळ्या कार्डांसाठी रिवॉर्ड सिस्टम वेगळी असेल. तुम्ही या रिवॉर्ड पॉइंट्सचा वापर भाडे देण्यासाठी, फ्लाइट आणि हॉटेल्स सारखे बुकिंग करण्यासाठी किंवा व्हाउचर खरेदी करण्यासाठी करू शकता. रिवॉर्ड पॉइंट्सद्वारे ग्राहकांना प्रोत्साहित करते, असे बँकेने म्हटले. जर तुम्ही क्रेडिट कार्डचा योग्य वापर केला तर ते तुम्हाला अनेक फायदे उपलब्ध होतील.

आता RuPay क्रेडिट कार्डवर बिनधास्त करता येणार पेमेंट, ग्राहकांसाठी आली आनंदाची बातमी
उदाहरणार्थ, Infinia कार्ड धारक बँकेच्या रिवॉर्ड पॉइंट पोर्टल SmartBuy वर एका महिन्यात फक्त १.५ लाख पॉइंट्स रिडीम करू शकतात. तर डायनर्स ब्लॅक कार्ड धारकांसाठी ही मर्यादा ७५,००० आहे तर इतरांसाठी ती ५०,००० आहे. तर इन्फिनिया कार्डधारक तनिष्क व्हाउचरवर एका महिन्यात जास्तीत जास्त ५०,००० पॉइंट्स रिडीम करू शकतात. बँकेच्या मिलेनिया, इझी ईएमआय मिलेनिया, भारत, फार्मेसी आणि पेटीएम कार्ड्सवर कॅशबॅक रिडेम्प्शन एका महिन्यात ३००० पॉइंट्सपर्यंत मर्यादित केले असून इतर कार्ड्सवर ५०,००० पॉइंट्स असतील. मात्र, हा बदल १ फेब्रुवारीपासून होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here