बॉडी पॉझिटिव्हिटी आणि आत्मविश्वास वाढवण्याचा संदेश देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या इंडो-कॅनेडियन टिकटॉकर मेघा ठाकूरचं गेल्या आठवड्यात कॅनडामध्ये निधन झालं. तिच्या आई, वडिलांनी इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून मेघाच्या निधनाची माहिती दिली. मेघाचे टिकटॉकवर ९ लाख ३० हजार फॉलोअर्स होते. मेघा अनेकदा तिच्या नृत्यांचे व्हिडीओ शेअर करायची.

मेघानं अचानक आणि अनपेक्षितपणे जगाचा निरोप घेतल्याची माहिती तिच्या पालकांनी दिली. मेघा २१ वर्षींची होती. २४ नोव्हेंबरला तिचं निधन झालं. ‘आमच्या आयुष्यातला प्रकाश, आमची मायाळू आणि सुंदर मुलगी मेघाचा २४ नोव्हेंबरच्या सकाळी अचानक आणि अनपेक्षित मृत्यू झाला. जड अंतकरणानं आम्ही तिच्या निधनाचं वृत्त जाहीर करत आहोत,’ असं तिच्या पालकांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नमूद केलं आहे.


मेघाकडे प्रचंड आत्मविश्वास होता. ती स्वावलंबी होती. आम्हाला तिची कायम आठवण येत राहील. तिचं तिच्या चाहत्यांवर खूप प्रेम होतं. तिच्या निधनाबद्दल यावेळी समजावं अशी तिचीच इच्छा होती. तुम्ही मेघासाठी प्रार्थना करावी अशी विनंती आम्ही करतो. तुमच्या प्रार्थना अनंताच्या प्रवासात तिच्यासोबत असतील, अशी भावुक पोस्ट मेघाच्या आई वडिलांनी लिहिली आहे. मेघाच्या अकाली निधनानं तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
गोवा फिरून रशियन महिला हॉटेलवर आली, दारू प्यायली; तितक्यात एकानं दार उघडलं अन् नको ते घडलं
मेघा वर्षाची असताना तिचे आई वडील कॅनडात स्थलांतरित झाले. २०१९ मध्ये मेफील्ड सेकंडरी स्कूलमधून उत्तीर्ण झाल्यानंतर मेघानं वेस्टर्न विद्यापीठात प्रवेश घेतला. पदवीसाठी प्रवेश घेतल्यानंतर तिनं टिकटॉकवर पदार्पण केलं. मेघा इन्स्टाग्रामवरदेखील लोकप्रिय होती. तिथे तिचे १ लाखांहून अधिक फॉलोअर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here