food poisoning | या व्यक्तीने शाळेबाहेरच्या आवारात जमलेल्या मुलांना चॉकलेट्स वाटली आणि संबंधित व्यक्ती तिथून निघून गेला. ही चॉकलेट्स मुलांनी खाल्ली. एक-दोन चॉकलेट्स खाल्लेल्या मुलांना फारसा त्रास जाणवला नाही. मात्र, अनोळखी व्यक्तीकडून चार ते पाच चॉकलेट्स घेऊन खाल्लेल्या मुलांना त्रास जाणवायला लागला. ही बाब शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर १८ मुलांना नजीकच्या लता मंगेशकर रुग्णालयात तातडीने दाखल केले.

हायलाइट्स:
- नागपूरमध्ये खळबळजनक घटना
- चॉकलेट्स खाल्ल्याने १८ मुलांना विषबाधा
- लता मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु
प्राथमिक माहितीनुसार, नागपूरच्या मदन गोपाळ अग्रवाल हायस्कूल या शाळेत हा प्रकार घडला. पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एक काळ्या रंगाची कार शाळेबाहेर येऊन थांबली. या कारमधून तोंडावर मंकी कॅप घातलेली एक व्यक्ती उतरली. या व्यक्तीने शाळेबाहेरच्या आवारात जमलेल्या मुलांना चॉकलेट्स वाटली आणि संबंधित व्यक्ती तिथून निघून गेला. ही चॉकलेट्स मुलांनी खाल्ली. एक-दोन चॉकलेट्स खाल्लेल्या मुलांना फारसा त्रास जाणवला नाही. मात्र, अनोळखी व्यक्तीकडून चार ते पाच चॉकलेट्स घेऊन खाल्लेल्या मुलांना त्रास जाणवायला लागला. ही बाब शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर १८ मुलांना नजीकच्या लता मंगेशकर रुग्णालयात तातडीने दाखल केले. येथील डॉक्टरांनी या विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार केले. तेव्हा या शाळकरी विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. सुदैवाने एकाही मुलाची प्रकृती गंभीर नाही. सर्व मुलांची प्रकृती उपचारानंतर स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच मुलांच्या पालकांनी लता मंगेशकर रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यामुळे सध्या रुग्णालयातील बालरुग्ण विभागाबाहेर पालकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर पालकांनी शाळेच्या सुरक्षाव्यवस्थेतबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. मुलांना चॉकलेटस वाटणारी व्यक्ती नेमकी कोण होती, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. पोलिसांकडून सध्या याप्रकरणाचा तपास सुरु आहे.
लग्न सभारंभातील जेवणातून २०० जणांना विषबाधा
भंडारा जिल्ह्यातील सरांडी बूजरूक येथे एका लग्नसोहळ्यातील जेवणातून २०० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला होता. विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. सरांडी येथील रहिवासी मदन नामदेवराव ठाकरे यांच्या मुलाचा विवाह सोहळा २९ नोव्हेंबरला पार पडला. त्यांनतर दुसऱ्या दिवशी ३० नोव्हेंबरला सरांडी येथे स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळच्या सुमारास या कार्यक्रमात किन्ही, सरांडीसह नजीकच्या गावातील पाहूण्यांनी हजेरी लावली. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी पोटदुखी, उलटी, जुलाबाचा त्रास जाणवू लागला. यानंतर या सर्वांना प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. तेव्हा या सर्वांना विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.