शिर्डी : ‘खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाले असून ते महाराष्ट्राच्या भावना व्यक्त करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानामुळे उदयनराजे भावनाविवश असून आम्ही सर्व त्यांच्याशी सहमत आहोत. मात्र त्यांच्याच पक्षाने छत्रपतींचा अपमान केलाय आणि त्याबद्दल पक्ष साधी माफी मागायला तयार नाही, असे सांगतानाच प्रेषित पैगंबर यांच्या बद्दल अपशब्द काढणाऱ्यांवर तात्काळ कारवाई होते मग छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही असा सवाल, शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी उपस्थित केलाय.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शनिवारी शिर्डीत सपत्निक साई दर्शन घेतले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी उदयनराजेंचे समर्थन करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. पैगंबराविषयी बोललेल्या नूपुर शर्मावर लगेच कारवाई झाली, मग छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई का नाही?, असा प्रश्न उपस्थित करत भाजपमध्ये ठरवून छत्रपतींचा अपमान करण्याची स्पर्धा सुरू असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.

हिंदू वयाच्या ४० वर्षांपर्यंत…; बद्रुद्दीन अजमल यांनी विवाहासंदर्भात केले वादग्रस्त विधान
आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन केले नसल्याचं भाजप सांगत असला तरी त्यांनी निषेधही केलेला नाही. समर्थन न करणे म्हणजे निषेध नाही. तुम्ही धिक्कार केला नाही की कारवाईची मागणी केली नाही, हा तुमचा नामर्दपणा आहे. राज्यपालांचे समर्थन केलं नाही हा भाजपचा खुलासा आमच्या जखमेवर मीठ चोळणारा असल्याचे संजय राऊत म्हणाले.

कर्नाटकच्या सरकारने वातावरण बिघडवण्यासाठी योजनाबद्ध आराखडा केला आहे. बेळगाव कारवार प्रश्नावरून लक्ष दूर करण्याचा हा प्रयत्न आहे. छत्रपतींच्या अपमानाबद्दल महाराष्ट्रात जो रोष निर्माण झालाय, त्यावरून लक्ष विचलीत करण्याचा देखील हा प्रयत्न आहे. महाराष्ट्र भाजप आणि कर्नाटक भाजपने केंद्राच्या मदतीने हा प्रश्न उकरून काढला आहे, असा आरोप करत राऊत यांनी सीमा प्रश्नाकडे गांभिर्याने बघण्याची गरज असल्याचे म्हंटले आहे. यासंबधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय करत आहेत?, असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

ऐकावं ते नवलच! सूर्याला पडू लागल्या विशाल भेगा, महाकाय खड्डे, पृथ्वीवर येत्या दोन दिवसांत…
राजेशाही असती तर छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांचा कडेलोट केला असता, ही उदयनराजेंची मागणी महाराष्ट्राची भावना आहे. साडेतीनशे वर्षांपासून टकमक टोकाचा वापर झाला नाही आहे. या निमित्ताने तो व्हावा, असे संजय राऊत म्हणाले.

या अगोदर बेळगावमध्ये महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी आंदोलने केली. जर आता दोन मंत्र्यांना जाता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. खरं तर मुख्यमंत्र्यांनी जायला पाहिजे. मंत्र्यांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाता येत नसेल तर फाळणी झालीय का?, हा काय भारत-पाकिस्तान आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. आमचा लढा कर्नाटकच्या जनतेशी नसून मानवतेचा आहे. अनेक दशकांपासून कर्नाटकात मराठी बांधवांवर अत्याचार सुरू असल्याची प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.
हमें जाना है…, जाना हैं तो जाने दो ना; राज्यपालांवर कारवाई केव्हा?, अजित पवारांनी व्यक्त केला अंदाज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here