नवी दिल्ली : शेअर बाजाराच्या चढ-उतारात तुम्हाला जास्त जोखीम पत्करायची नसेल, तर म्युच्युअल फंडात गुंतवणूक तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. विशेष म्हणजे इथे तुम्ही दर महिन्याला छोटी रक्कम गुंतवू शकता. म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्याची सुविधा आहे. यातील छोटी गुंतवणूक तुमच्यासाठी नंतर मोठा फंड तयार करू शकते.

तुम्ही रु. १० हजाराच्या एसआयपीसह १३ कोटी रुपयांचा निधी जमा करू शकता. विश्वास बसत नाही ना, पण दीर्घकाळात हे शक्य असून प्रत्यक्षात हे घडले आहे. ४ स्टार रेट केलेल्या म्युच्युअल फंडाने २७ वर्षांत रु. १० हजार एसआयपीचे रूपांतर १३ कोटीत केला आहे. जर एखादी व्यक्ती नोकरीच्या सुरुवातीपासून एसआयपीत गुंतवणूक करत असेल तर निवृत्तीपर्यंत त्याच्याकडे खूप मोठी रक्कम तयार झाली असती.

बाजार सर्वकालीन उच्चांकावर; इक्विटीच्या तेजीत म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची कमाई, पाहा आता काय करावे
निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड
निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडाने आश्चर्यकारक काम केले आहे. हा फंड मिड कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतो. गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत उत्कृष्ट परतावा देण्यासाठी हा फंड मोठ्या वाढीच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो ज्यांच्याकडे लार्ज कॅप बनण्याची क्षमता आहे. फंडाला मॉर्निंगस्टारने ३-स्टार रेटिंग आणि व्हॅल्यू रिसर्चने ४-स्टार रेटिंग दिले आहे. ८ ऑक्टोबर १९९५ रोजी हा निधी सुरू करण्यात असून आता या निधीला २७ वर्षे यशस्वीपणे पूर्ण झाली आहेत. फंडाने सुरुवातीपासून २२.२९% चा सीएजीआर दिला आहे.

निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड कामगिरी
गेल्या वर्षी, या फंडाने ११.८९% वार्षिक एसआयपी परतावा दिला होता. तर गेल्या तीन वर्षांत या फंडाने २७.५३% वार्षिक SIP परतावा दिला आहे. म्हणजेच तुम्ही देखील जर या फंडात गुंतवणूक केली असती तर तुमच्या १० हजार रुपयांच्या मासिक एसआयपीसह, तुमची एकूण गुंतवणूक रु. ३.६- लाखांवरून ५.३१ लाख रुपये झाली असेल. या फंडाने गेल्या पाच वर्षांत २१.१०% वार्षिक एसआयपी परतावा दिला असून तुमच्या १०,००० रुपयांच्या मासिक एसआयपीमुळे तुमची एकूण ६ लाख रुपयांची गुंतवणूक १०.०८ लाख रुपयांपर्यंत वाढली असेल.

म्युच्युअल फंड सही है! १० हजारांच्या एसआयपीने मिळवून दिले २८ लाख, तुम्हीही पैसा गुंतवलाय का?
दहा वर्षांत जोरदार वार्षिक परतावा
निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडाने गेल्या दहा वर्षांत १७.३७% वार्षिक एसआयपी परतावा दिला, तर १० हजार रुपयांच्या मासिक एसआयपीसह, तुमची एकूण गुंतवणूक आता १२ लाख रुपयांवरून २९.७७ लाख रुपयांपर्यंत वाढली असेल. याशिवाय गेल्या १५ वर्षांत १५.७१% वार्षिक एसआयपी परतावा दिला तर १०,००० रुपयांच्या मासिक एसआयपीसह, तुमची १८ लाख रुपयांची गुंतवणूक ६५.३५ लाख रुपयांपर्यंत वाढली असेल. तसेच गेल्या २० वर्षांत या फंडाने १८.९९% वार्षिक एसआयपी परतावा दिला आहे. त्यामुळे १० हजार रुपयांच्या मासिक एसआयपीमुळे तुमची २४ लाख रुपयांची संपूर्ण गुंतवणूक आता २.१७ कोटी रुपयांपर्यंत वाढली असेल.

महिन्याला २० ते २५ हजार कमाई करणारा करोडपती होऊ शकतो? हा सुपरहिट फॉर्म्युला पाहाच

२५ वर्षातील परतवा किती
या फंडाने गेल्या २५ वर्षांत २२.१२% वार्षिक एसआयपी परतावा दिला असून त्यामुळे १० हजार रुपयांच्या मासिक एसआयपीमुळे तुमची वास्तविक गुंतवणूक ३० लाख रुपयांवरून ८.८७ कोटी रुपयांपर्यंत वाढली असेल. म्हणजेच फंड सुरू झाल्यापासून तुम्ही मासिक १०,००० रुपयांची एसआयपी केली असती तर तुमची एकूण रु. ३२.४० लाखाची गुंतवणूक १३.६७ कोटी झाली असती. या कालावधीत फंडाने २२.२९% वार्षिक परतावा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here