Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 3 Dec 2022, 8:02 pm
twin sisters marries with one boy | पिंकी आणि रिंकी दोघी जुळ्या असल्याने दिसायलाही एकसारख्याच आहेत. लहानपणापासून एकत्रच राहिल्याने आपण लग्न करून एकाच घरी जायचे, हे दोघींनीही ठरवले होते. त्यामुळे आपण एकाच तरुणाशी लग्न करायचे, या दोघींनी फार आधीपासूनच ठरवले होते. अखेर त्याच्या कुटुंबाने या विवाहास मान्यता दिली होती .

हायलाइट्स:
- जुळ्या बहिणींचं एकाच तरुणाशी लग्न
- आयटी इंजिनिअर असलेल्या बहिणींचा एकाच तरुणावर जीव जडला
पिंकी आणि रिंकी दोघी जुळ्या असल्याने दिसायलाही एकसारख्याच आहेत. लहानपणापासून एकत्रच राहिल्याने आपण लग्न करून एकाच घरी जायचे, हे दोघींनीही ठरवले होते. त्यामुळे आपण एकाच तरुणाशी लग्न करायचे, या दोघींनी फार आधीपासूनच ठरवले होते. अखेर त्याच्या कुटुंबाने या विवाहास मान्यता दिली होती . काल अकलूज वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे हा अनोखा विवाह संपन्न झाला .
मुलाचा माळशिरस तालुक्यातील असणाऱ्या अतुल या तरुणाचा या कुटुंबाशी संबंध आला. या मुलींच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्यानंतर या मुली आईसोबत राहत होत्या . एकदा या कुटुंबातील आई व दोन मुली आजारी पडल्यावर अतुल याच्या गाडीतून त्या दवाखान्यात जात असत . याचवेळी अतुल आणि या दोन तरुणींचा संपर्क वाढत गेला. अखेर काल अतुल याने पिंकी आणि रिंकी या दोन्ही तरुणींशी एकाच मांडवात विवाह केला. या अनोख्या विवाहाला दोन्हीकडील जवळपास ३०० पाहुणे मंडळी लग्नासाठी गलांडे हॉटेलमध्ये जमले होते. अतिशय थाटात झालेल्या या विवाहाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर याची सर्वत्र चर्चा सुरु झाली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.