कृष्णकांत पांडे असं अटक केलेल्या पतीचे नाव असून तो मुंबईत राहतो. पत्नी अंजली त्याच्यासोबत राहत नाही. पत्नी नांदायला येत नाही यावरून त्याचा तिच्यावर राग होता. बुधवारी डोंबिवली पश्चिमेत ती काम करत असलेल्या ठिकाणी कृष्णकांत आला आणि त्याने तिला बाहेर बोलावले. “मी तुला मारून टाकतो”, अशी धमकी देत त्याने त्याच्याकडील विषारी औषध मिसळलेला ज्यूस तिला जबरदस्तीने पाजला व तेथून पसार झाला.
विषमिश्रित ज्यूस पोटात गेल्याने अंजलीची प्रकृती गंभीर असून कळवा येथील सरकारी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. कृष्णकांतला तिच्या तक्रारीवरून अटक केल्याची माहिती डोंबिवली एसीपी सुनील कुराडे यांनी दिली.
दरम्यान, सांताक्रूझ (पश्चिम) येथील गारमेंट व्यावसायिक कमलकांत शहा यांची स्लो पॉयझन देऊन हत्या केल्याबद्दल त्यांची ४६ वर्षीय पत्नी काजल शाह आणि तिचा प्रियकर हितेश जैन (४५) यांना गुरुवारी अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की काजल आणि हितेश यांना शाहांची मालमत्ता हडप करायची होती. यासंदर्भात तिने विमा एजन्सीकडे तिच्या पतीच्या पॉलिसींबद्दल चौकशी केली होती. शहा यांच्या पोस्टमार्टम अहवालानंतर दोघांना अटक करण्यात आली. दोघांनी त्यांना ठार मारण्यासाठी अन्नातून थॅलियम आणि आर्सेनिक देण्याचा कट रचला होता.
उदयनराजेंचे आभार तर फडणवीसांना पुन्हा सुनावलं; पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले