Pune College student, पुण्यात मॅनेजमेंटच्या विद्यार्थिनीचे उतरवले कपडे; मित्र-मैत्रिणींवर गुन्हा दाखल, शहरात खळबळ – a case has been registered in lonikand police station against the friends who undressed a management student in pune
पुणे : पुणे शहरात गुन्हेगारीचे धक्कादायक प्रकार दिवसेंदिवस समोर येत आहेत. अशातच आता एका विद्यार्थिनीवर चोरीचा आळ घेत तिचे कपडे उतरवल्याचा प्रकार उघड झाला आहे. संबंधित मुलीच्या मैत्रिणी एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर त्यांनी तिचे कपडे उतरवताणाचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून ८० हजार रुपये उकळले असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी आता लोणीकंद पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. संबधित मुलगी ही हरियाणा येथे राहणारी असून पोलिसांनी हा गुन्हा लोणीकंद पोलिसांकडे वर्ग केला आहे. सदर प्रकार हा १७ ऑक्टोबर रोजी घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिचे मित्र आणि मैत्रिणी हे सर्वजण वाघोली येथील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट येथे शिकत आहेत. तीन मैत्रिणी एकाच फ्लॅटमध्ये राहात होत्या. मात्र या ठिकाणी चोरी होत होती. काही गोष्टींची शंका आल्याने तिने तात्काळ रूम बदलली आणि शेजारच्या रुममध्ये राहायला गेली. त्यामुळे अगोदरच्या रुममध्ये राहत असलेल्या आरोपींनी संबंधित तरुणीच्या रुममध्ये येऊन तू चोरी केली असून लॅपटॉप आणि सोन्याची साखळी चोरी केल्याचे म्हणत तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिच्या मैत्रिणींनी दुसऱ्या रुममध्ये नेऊन तिची कपडे काढून झाडाझडती घेतली आणि तिची झाडाझडती घेतानाचा व्हिडिओ काढला. Solapur News: अकलुजमधील जुळ्या बहिणींनी एकाच तरुणाशी लग्न केलं, वाचा नेमकं काय घडलं?
या प्रकाराबाबत कुणाला काही सांगितले तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. इतकेच नाही तर तिच्या दोन मित्रांनी देखील तिचे कपडे काढून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या दोघांनीही दारू प्यायली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तिच्याविरोधात पोलिसात तक्रार देऊन दोन लाख रुपयांची मागणी केली. मात्र प्रसंगावधान दाखवून पीडित तरुणीने आरडाओरडा केल्याने ते दोन तरुण आणि मुली घटनास्थळावरून पळून गेल्या. घडल्या प्रकाराने घाबरलेली तरुणी तिच्या हरियाणा येथील घरी गेली. घडलेला सर्व प्रकार तिने कुटुंबियांनी सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने हरियाणा येथल्या सिरसा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या पोलिसांकडून या घटनेचा तपास पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
दरम्यान, याप्रकरणी साक्षी रातुडी, तरन्नुम मलिक, रोहन सहगल, आशुतोष वर्मा आणि महाकृषी तिवारी ( सर्व रा. वाघोली) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Hurrah! After all I got a blog from where I know how to actually get valuable
facts regarding my study and knowledge.
Also visit my blog post slot online