दौंड : दौंड शहरात कुरकुंभ मोरीजवळ कोयत्याने सपासप वार करून एका २५ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. खून करून आरोपी स्वत: दौंड पोलीस ठाण्यात हजर झाल्याची घटना सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. मयुर चितारे असं खून झालेल्या तरुणाचे नाव असून अर्जुन काळे असं पोलीस ठाण्यात हजर झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दौंड शहरातील कुरुकुंभ मोरीजवळ मयुर चितारे व अर्जुन काळे यांच्यात वाद सुरू होता. हाच वाद नंतर विकोपाला गेला आणि काळे याच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्राने त्याने मयुरवर सपासप वार केले. वार करून काळे हा सदर ठिकाणावरून निघून गेला. मयुर चितारे हा रक्ताच्या थारोळ्यात पडला असता काही नागरिकांनी त्याला जवळच असलेल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले.

Aftab Narco Test: श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यासाठी आफताबने कोणती हत्यारं वापरली?

दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून आरोपी हा स्वतः हून दौंड पोलीस ठाण्यात हजर झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here