सोलापूर: एकाच मांडवात दोन जुळ्या बहिणींशी केलेला विवाह नवरदेवाच्या अंगलट आला आहे. त्याच्याविरोधात भारतीय दंड संहिता १८६० च्या ४९४ कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात NCR दाखल झाला आहे. अतुल उत्तम अवताडे या महाळुंग परिसरातील गट नंबर २ मध्ये राहणाऱ्या तरुणाने २ डिसेंबर रोजी अकलूज जवळील गलांडे हॉटेलमध्ये एकाच मांडवात रिंकी मिलिंद पाडगावकर आणि पिंकी मिलिंद पाडगावकर या दोन जुळ्या बहिणींशी विवाह केला होता. या अनोख्या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यावर याची माहिती समोर आली. दरम्यान माळेवाडी येथील राहुल फुले यांनी याबाबतची तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे .

एकाच मांडवात दोन जुळ्या मुलींशी विवाह
मुंबई येथील दोन जुळ्या आयटी इंजिनियर मुलींनी एकाच मांडवात एका तरुणासोबत विवाह केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे घडली. नवरदेव अतुल अवताडे हा माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील असून त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. लिफ्ट अडकली; लहानगा रडू लागला, आक्रोश केला, हात दारावर आपटले; चिमुरड्याचं पुढे काय झालं?
कांदिवली येथील आयटी इंजिनियरिंग करून गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीत असणाऱ्या पिंकी मिलिंद पाडगावकर आणि रिंकी मिलिंद पाडगावकर या जुळ्या बहिणीनी अतुलशी एकाच वेळी एकाच मांडवात विवाह केला आहे. पिंकी आणि रिंकीला एकमेकींबद्दल अतिशय ओढा असून आजवर त्या दोघी एकाच पानात जेवतात.

बालपणापासून एकत्र राहत असलेल्या पिंकी आणि रिंकीला शेवटपर्यंत सोबतच राहायचं आहे. त्यामुळेच त्यांनी एकाच तरुणाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. कायम एकत्र राहण्यासाठी त्यांना एकच नवरा हवा होता. अखेर अवताडे आणि पाडगावकर कुटुंबाने या विवाहास मान्यता दिली. अकलूज वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे २ डिसेंबरला हा अनोखा विवाह संपन्न झाला.
अरेरे! ५ फुटी सळई उडाली, ट्रेनची खिडकी फोडून मानेतून आरपार गेली; ३ दिवसांनंतर होता वाढदिवस
मूळचा माळशिरस तालुक्यातील असणाऱ्या अतुलचा पाडगावकर कुटुंबाशी संबंध आला. या मुलींच्या वडिलांचे काही दिवसापूर्वी निधन झाल्यानंतर या मुली आईसोबत राहत होत्या. एकदा पाडगावकर कुटुंबातील आई व दोन्ही मुली आजारी पडल्यावर अतुल यांच्याच कारमधून त्या दवाखान्यात जात असत. अतुलने पाडगावकर कुटुंबाची आजारपणात सुश्रुषा केल्याने त्यांच्यातील जवळीक वाढली होती. अखेर २ डिसेंबरला अतुल अवताडेने पिंकी आणि रिंकी पाडगावकर या दोन्ही तरुणींशी एकाच मांडवात विवाह केला. या अनोख्या विवाहाला दोन्हीकडील जवळपास ३०० पाहुणे मंडळी गलांडे हॉटेलमध्ये जमली होती. अतिशय थाटात झालेल्या या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर याची सर्वत्र चर्चा सुरू झाली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here