सॅन ऍन्ड्रेस: कोलंबियातील सॅन एँड्रेसच्या व्हाईट वाटा समुद्र किनाऱ्याजवळ एक भयंकर घटना घडली. बोटीच्या पंख्यामुळे झालेल्या गंभीर जखमांमुळे एका २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. नतालिया एँड्रेया लॅरानॅगा फजार्डा असं तरुणीचं नाव आहे. कॅरेबियन समुद्रात तिच्यासोबत अतिशय दुर्दैवी अपघात झाला. तरुणीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र आठवड्याभरानंतर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नतालियाच्या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. नतालिया २७ नोव्हेंबरला सॅन ऍन्ड्रेसमधील व्हाईट वाटा समुद्र किनाऱ्यावर गेली होती. बोटीतून फिरत असताना तिची चप्पल पाण्यात पडली. चप्पल पाण्यातून शोधण्यासाठी नतालियानं बोटीतून उडी घेतली. यावेळी बोटीचा पंखा सुरू होता. अतिशय वेगानं फिरणाऱ्या पंख्याचा तडाखा नतालियाला बसला. ती अतिशय गंभीर जखमी झाली.
अरेरे! ५ फुटी सळई उडाली, ट्रेनची खिडकी फोडून मानेतून आरपार गेली; ३ दिवसांनंतर होता वाढदिवस
नतालियाला अपघात झाला त्यावेळी आसपास काही बोटी होती. त्यापैकी एकानं ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. नतालियाला अपघात होतात आसपास असलेले पर्यटक जोरजोरात ओरडू लागले. अवघ्या काही क्षणांमध्ये बोटीजवळ असलेलं निळंशार पाणी लालबुंद झालं. नतालियाच्या पायांना, पाठीला गंभीर जखमा झाल्या. त्यातून रक्तस्राव सुरू झाला.

नतालियाला जेटस्कीमधून बेटावरील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या धमन्यांना अत्यंत गंभीर स्वरुपाची इजा झाली होती. तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र काल सकाळी तिची हृदयक्रिया थांबली. नतालिया सुट्टीसाठी ऍन्ड्रेसला गेली होती.
२० सेकंदांत ११४चा स्पीड गाठला अन् अनर्थ घडला; दोन तरुणांचा अंत; त्यांनीच रेकॉर्ड केला VIDEO
नतालियाच्या बोटीत एकूण २४ पर्यटक आणि २ कर्मचारी होते. बोटीवरील दोन्ही कर्मचाऱ्यांची घडलेल्या घटनेप्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती कोलंबियन नौदलाच्या तटरक्षक दलानं दिली. संबंधित बोट बंद ठेवण्यात आली आहे. ती सध्या पर्यटकांच्या सेवेत नाही. या प्रकरणाची सखोल सुरू असल्याचं तटरक्षक दलाकडून सांगण्यात आलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here