bride died due to heart attack on stage: उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये विवाह सोहळ्यातील आनंदाची जागा दु:ख आणि आक्रोशानं घेतली. नवऱ्याच्या गळ्यात हार घालताच नवरीचा मृत्यू झाला आणि दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मलिहाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भदवाना गावात ही घटना घडली. इथे वास्तव्यास असलेल्या शिवांगीचा विवाह सोहळा सुरू होता. त्यावेळी लग्न मंडपात शिवांगीनं अखेरचा श्वास घेतला.

शिवांगीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तिला तपासलं आणि मृत घोषित केलं. हृदयविकाराचा झटका आल्यानं शिवांगीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. नवरीचा मृत्यू झाल्याचं समजताच मंडपात जमलेल्यांवर शोककळा पसरली. अवघ्या काही मिनिटांमध्ये आनंदाची जागा दु:खानं घेतली. शिवांगीची आई कमलेश कुमारी, लहान बहिण सोनम आणि भाऊ अमितची अवस्था अतिशय बिकट आहे. विवेकलादेखील जबर धक्का बसला आहे.
लग्नात नाचताना हृदयविकाचा झटका; भावोजींचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या पालीमध्ये लग्न सोहळ्यात एका व्यक्तीचा नाचताना मृत्यू झाला. मेहुणीच्या लग्नात ठेका धरलेले भावोजी अचानक स्टेजवर कोसळले. त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला होता.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.