वॉशिंगटन: मुलगी झाली ती ओझं आहे हे मानून जन्मताच तिचा त्याग करणारे अनेक लोक तुम्ही पाहिले असतील. पण, तिच मुलगी तुमच्या घरात सुख-समृद्धी देखील आणते. याचंच एक उदाहरण सध्या चर्चेत आहे. जिथे एका महिलेने सकाळी मुलीला जन्म दिला आणि सायंकाळी ती ८० लाखांची मालकीन झाली. मुलीला जन्म दिल्यानंतर महिलेचे नशीबच बदलले. ती अचानक ८० लाख रुपयांची मालक बनली. या महिलेने तिच्या मुलीला लकी चार्म असं म्हटलं आहे. मला वाटतं की माझ्या मुलीनेच माझे नशीब बदलले आहे, मी तिची खूप आभारी आहे, असंही ती महिला म्हणाली.

अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील या २८ वर्षीय महिला ब्रेंडा हिने ९ नोव्हेंबरला सकाळी एका मुलीला जन्म दिला. त्याच दिवशी संध्याकाळी तिला लॉटरी लागली. तिला बक्षीस म्हणून ८०,००० पाऊंड म्हणजेच सुमारे भारतीय चलनात सुमारे ८० लाख रुपये मिळाले. टॅक्स वगैरे कापल्यानंतर ब्रेंडाला जवळपास ५३ लाख रुपये मिळाले. ३० नोव्हेंबर रोजी ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली.

Woman won lottery

हेही वाचा –IND vs BAN: रोहित शर्मा धोनीचा बदला घेणार, 7 वर्षांपूर्वी बांगलादेशमध्ये नेमकं काय घडलं होतं?

आता तिची कहाणी सोशल मीडियावर चर्चेत आहे. द मिररच्या वृत्तानुसार, पुरस्कार जिंकल्यानंतर ब्रेंडा म्हणाली- ‘माझ्या मुलीने माझे नशीब बदलले, मी तिची आभारी आहे. ती माझ्यासाठी लकी चार्म ठरली’.

यूएस पॉवरबॉल लॉटरी ड्रॉ जाहीर होताच ब्रेंडा आनंदाने उड्या मारु लागली, असं ती सांगते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मला ८० लाखांची लॉटरी लागली आहे. हे ऐकून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. सकाळी मुलगी झाली आणि संध्याकाळी मी लॉटरी जिंकली. या दुहेरी आनंदाने माझ्या संपूर्ण कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

हेही वाचा –हडपसरमध्ये खाजगी ट्रॅव्हल्स आणि पीएमटीची समोरासमोर धडक, गाड्यांची स्थिती पाहून धडकी भरेल…

ब्रेंडा बक्षिसाच्या रकमेने पहिले तिच्या कर्जाची परतफेड करेल. त्यानंतरच इतर कामासाठी पैसे खर्च करेल, असं तिने सांगितलं. ब्रेंडाला आधीच दोन मुले आहेत. तिच्या वाढदिवशी ती लॉटरी खरेदी करत होती पण तिला कधीही यश आलं नाही. मात्र, मुलीच्या जन्माच्या दिवशीच तिला लॉटरी लागली. ब्रेंडा याला चमत्कारापेक्षा कमी मानत नाही.

हेही वाचा –बिअर रडवणार! कंपनीकडून किमती वाढवण्याचा निर्णय, पण कारण काय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here