container running for one kilometer without driver: झारखंडच्या लोहरदगामधील राष्ट्रीय महामार्ग-१४३ ए वर एक कंटेनर चालकाशिवाय धावत होता. जवळपास एक किलोमीटर कंटेनर चालकाशिवाय पळत होता. हा प्रकार पाहून सगळ्यांचेच धाबे दणाणले. स्क्रॅप घेऊन निघालेल्या कंटेनरवरील चालकाचं नियंत्रण सुटलं. जीव वाचवण्यासाठी त्यानं कंटेनरमधून उडी मारली. यानंतर कंटेनर महामार्गावर धावत होता. त्यानं विजेच्या खांबांना, झाडांना, दुकानांना धडक दिली.

जवळपास एक किलोमीटर अंतर कंटेनरनं चालकाशिवाय कापलं. कंटेनर पतराटोली परिसरात पोहोचला. त्यावेळी त्याचा वेग काहीसा कमी झाला. एका तरुणानं कंटेनर थांबवला. कमी झालेल्या वेगाचा फायदा घेत तरुणानं ब्रेक दाबला आणि पुढचा अनर्थ टाळला. कंटेनर चालकाशिवाय एक किलोमीटर धावला. सुदैवानं यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कंटेनर चालकाचा शोध सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचल्याची माहिती लोहरदगा पोलीस ठाण्याचे प्रभारी पंकज कुमार शर्मांनी दिली. कंटेनर जप्त करण्यात आला आहे. त्याच्या चालकाचा शोध सुरू आहे. कंटेनरवरील नियंत्रण सुटताच जीव वाचवण्यासाठी चालकानं उडी मारली. त्यानंतर त्याचा शोध लागलेला नाही.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.