दोहा: ”चे कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी कतारमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत मायभूमीत परतण्यासाठीची गेले काही आठवडे मोहीम राबविली. त्यासाठी चार्टर्ड विमानांची व्यवस्था करण्यात आली होती. या मोहिमेत सुमारे ८०० जणांना मायदेशी पाठवण्यात आले असून या मोहिमेबद्दल सर्व प्रवशांनी मंडळाचे आभार मानले आहेत. ( Maharashtra Mandal )

वाचा:

येथील भारतीय राजदूतावास व ( इंडियन कल्चरल सेंटर) यांच्या सहकार्याने खोळंबलेल्या महाराष्ट्रीय नागरिकांसाठी चार विशेष विमाने अनुक्रमे मुंबई व नागपूर साठी दिनांक ३, ४ आणि ९ जुलै २०२० रोजी रवाना झाली. त्यात महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व छत्तीसगड येथील जवळपास ८०० खोळंबलेल्या प्रवाशांनी प्रवास केला. या व्यतिरिक्त भारतीय राजदूतावासाच्या ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत राबवलेल्या विमान व्यवस्थापनेमध्येही मंडळाने हिरीरीने हातभार लावला.

महाराष्ट्र मंडळ कतारच्या अध्यक्षा नीलांबरी सुशांत सावर्डेकर यांनी या मोहिमेबद्दल माहिती दिली. महाराष्ट्र मंडळ कतारने आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून हा उपक्रम राबविला व या उपक्रमाअंतर्गत अतिशय माफक दरात तिकिटे, गरजू कामगार बंधूंना एअरपोर्टसाठी मोफत बस सेवा, मूलभूत गरजा असलेली अन्न-औषधे या व अशा विविध समाजपयोगी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. या सर्व समाजपयोगी प्रकल्पातून मंडळाने खऱ्या अर्थाने रौप्यमहोत्सव साजरा केला, असे नीलांबरी सावर्डेकर म्हणाल्या.

वाचा:

भारतीय दूतावासात नोंदणी केलेल्या महाराष्ट्रीय नागरिकांमधूनच प्राधान्यक्रमाने प्रवाशांची निवड करण्यात आली. गरोदर स्त्रिया, आपत्कालीन आरोग्यसेवेची निकड असलेले रुग्ण, रोजगार गमावलेले कामगार व वरिष्ठ नागरिक अशा प्रवाशांना यामध्ये प्राधान्य देण्यात आले. यात भारतीय राजदूतावास, कतारमधील भारतीय राजदूत पी. कुमरन, कौंसिलिंग अधिकारी राजेश कांबळे, भारतीय सांस्कृतिक केंद्र उपाध्यक्ष विनोद नायर, शिक्षण आणि सांस्कृतिक समन्वयक डॉ. नयना वाघ यांचे सहकार्य लाभले, असा सावर्डेकर म्हणाल्या.

मंडळाचे उपाध्यक्ष संतोष साळुंखे, चिटणीस संजय पाटील, सहचिटणीस पराग सोनवणे, खजिनदार अतुल देसवंडीकर, समिती सदस्य श्वेता कोष्टी, सुजित खनलोसकर, निलेश पार्सेकर, सागर मांणगावकर, अजय ढोले, स्वयंसेवक सुशांत सावर्डेकर, विकास ठाकरे, श्रेया पाटील, श्वेता आणि गौरव दारोकर, वैष्णवी साळुंखे, अमित पराड, मुग्धा सरनाईक, आरीफ मुकादम, शैलेश शिंदे, अदिती गायकवाड, प्रणव शिंदे, प्रसाद कुलकर्णी, सुनील डकुआ, आनंद खांझोडे, केदार आफळे, कैलाश थोरात, सूर्या नामदुरी, सचिन टेंभूळकर, मनोहर खरात, गजानन रावण, नितीन व नम्रता तावडे, सुनील साखरे, अनिरुद्ध सोनगिरे यांनी या मोहिमेत अथक परिश्रम घेतले. या सर्व उपक्रमासाठी मंडळाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here