शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने बच्चू कडू नाराज आहेत. विस्तारावेळी तरी आपल्याला स्थान मिळेल, अशी आशा त्यांना आहे. दरम्यानच्या काळात ते शिंदे गटात नाराज असल्याच्याही चर्चा होत्या. अशावेळी बच्चू कडू ठाकरेंना साथ देतील, असा दावा करुन चंद्रकांत खैरे यांनी मोठा बॉम्ब फोडला आहे.
चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
“बच्चू कडू माझे खूप चांगले मित्र आहेत. त्यांचं कामही खूप बोलकं आहे. दिव्यांगांचे त्यांना खूप आशीर्वाद लाभतील. पण ते उद्धव ठाकरेंसोबत राहिले तर मला अधिक चांगलं वाटेल, असं चंद्रकांत खैरे म्हणाले. त्यावर तुम्ही त्यांना एकत्रित आणण्यासाठी काही प्रयत्न करणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना खैरे म्हणाले, ” आणि बच्चू कडू यांचं एकमेकांवर प्रेम आहे. त्यांचं थेट उद्धव ठाकरेंशी बोलणं होतात. ते त्यांच्याकडे जातील आणि बोलतीलही…”
दुसरीकडे चंद्रकांत खैरे यांनी बच्चू कडू यांच्या टीकेलाही उत्तर दिलं. चंद्रकांत खैरे रिकामटेकडे आहेत, त्यांना काही काम उरलं नाहीये, या बच्चू कडू यांच्या टीकेवर बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, “बच्चू भाऊ आमच्या संभाजीनगर जिल्ह्यात ५ आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे. त्यामुळे संभाजीनगर जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. जनतेची खूप कामे आहेत. संघटनेची खूप कामे आहेत. मी कामामध्ये खूप व्यस्त असतो.”