मुंबई: प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला पोलिसांनी अटक केली. पत्नी आणि तिच्या प्रियकरानं पोलीस चौकशीत हत्येची कबुली दिली. जेवणात आर्सेनिक आणि थॅलियम मिसळून त्याच्यावर विषप्रयोग केल्याची कबुली दोन्ही आरोपींनी दिली. मात्र सासूच्या मृत्यूला आपण जबाबदार नसल्याचा दावा महिलेनं केला. सासूच्या मृत्यूमध्ये आपला कोणताच हात नसल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं.

कमलकांत शाह (४५) आणि त्यांची आई सरला देवी (६५) यांचा दोन महिन्यांच्या अंतरानं मृत्यू झाला. वैद्यकीय अहवाल, तांत्रिक पुरावे पाहता दोघांचा मृत्यू सारख्याच परिस्थितीत झाला आहे. त्यामुळे कमलकांतची पत्नी काजल आणि तिचा प्रियकर हितेश या दोघांनीच सरला देवीची हत्या घडवली असावी असा संशय पोलीस आणि शाह कुटुंबाला आहे.
आफताब अनपेक्षित चाल खेळला, पोलीस हैराण; श्रद्धाचा मारेकरी शिक्षेशिवाय सुटणार?
सरला देवी यांचा १३ ऑगस्टला मृत्यू झाला. अवयव निकामी झाल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. तर कमलकांत यांचा मृत्यू १९ सप्टेंबरला झाला. त्यांच्याही मृत्यूचं कारण सारखंच होतं. हितेशनं आणून दिलेलं आर्सेनिक आणि थॅलियमचं मिश्रण पतीच्या जेवणात कालवल्याची कबुली काजलनं दिली. हितेशनं मिश्रणाच्या २०० मिलीच्या सात ते आठ बाटल्या आणून दिल्याचंही तिनं पोलिसांना सांगितलं.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं शुक्रवारी काजल शाह आणि तिचा प्रियकर हितेशला अटक केली. त्यांना ८ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इंटरनेटवरून स्लो पॉयजनिंगची कल्पना सुचल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. हितेशचा स्टेशनरी आणि गिफ्ट्सचा व्यवसाय आहे. त्यानं त्याच्या फार्मसिस्ट ग्राहकाकडून केमिकल्स मिळवली. या ग्राहकाचा जबाब पोलीस नोंदवणार आहेत. पोलिसांनी शाह यांच्या घरात जाऊन फॉरेन्सिक चाचणी केली आहे.
अरेरे! नवजीवनाला सुरुवात करताना आयुष्याचीच अखेर; नवऱ्याच्या गळ्यात हार घालताच नवरीचा अंत
हितेशनं लगेचच गुन्ह्याची कबुली दिली. मात्र काजलनं बराच वेळ घेतला. तिनं सुरुवातीला आपला या कटात सहभागच नसल्याचा दावा केला. त्यामुळे या सगळ्यामागे काजलचाच हात असल्याचा संशय पोलिसांना आला. हितेशनं गु्न्ह्याची कबुली दिल्याचं काजलला समजताच तिनंही कबुली दिली. ऑगस्ट २०२२ मध्ये या सगळ्यासाठी कट रचण्यात आला.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांकडून सत्य वदवून घेण्यासाठी पोलिसांनी जुनाच फंडा वापरला. पोलिसांनी दोघांची स्वतंत्रपणे चौकशी केली. दोघांचे जबाब परस्परविरोधी होते. त्यामुळे त्यांचा बनाव उघड झाला. एकमेकांच्या संपर्कात नसल्याचा, न भेटल्याचा दावा त्यांनी केला. पण त्यांच्या फोन आणि व्हॉट्स ऍप संभाषणांमुळे पितळ उघडं पडलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here