mobile battery blast, बापरे! दुकानदाराच्या चेहऱ्यासमोर मोबाईल बॅटरीचा स्फोट; एखाद्या बॉम्बसारखी फुटली, पाहा VIDEO – mobile battery explodes in shop owners face in mps ratlam dramatic visuals caught on cctv
रतलाम: मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यात जावरा नगरमध्ये मोबाईलचा स्फोट झाला. मोबाईल दुकानात गेलेल्या ग्राहकाच्या स्मार्टफोनमधील बॅटरीनं अचानक पेट घेतला. बॅटरीचा स्फोट होताच दुकानात धूर पसरला. दुकानदारानं प्रसंगावधान राखत आग विझवली. त्यामुळे अनर्थ टळला. सुदैवानं कोणालाही इजा झाली नाही. दुकानदार आणि ग्राहक थोडक्यात बचावले. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शनिवारी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. जावरा नगरमधील हाथी खाना परिसरात असलेल्या आपल्या मोबाईल दुकानात अक्रम बसले होते. त्यांच्या समोर एक ग्राहक उभा होता. तितक्यात तिकडे आणखी एक ग्राहक आला. त्याच्याकडे विवो कंपनीचा मोबाईल होता. बॅटरीची समस्या असल्याचं ग्राहकानं अक्रम यांना सांगितलं. संपूर्ण शरीरावर पुरळ, अवयव निकामी झाले; केशरोपणानंतर तरुणाचा वेदनादायी मृत्यू; आईचा आक्रोश अक्रम यांनी मोबाईल उघडला. त्याची बॅटरी तपासून पाहिली. बॅटरी खराब झाल्याचं अक्रम यांनी ग्राहकाला सांगितलं. दुकानदारानं बॅटरी एका बाजूला फेकली. त्या दरम्यान तिथे उभ्या असलेल्या व्यक्तीनं बॅटरी उचलून काऊंटरवर ठेवली. बॅटरी फेकू नका. ती विकली जाते, असं त्यानं सांगितलं. ते ऐकून अक्रम बॅटरी चेक करू लागले. तितक्यात बॅटरीचा स्फोट झाला. जोरदार आवाज आला आणि आगीचा भडका पाहायला मिळाला.
बॅटरीचा अचानक स्फोट झालेला पाहून ग्राहक आणि दुकानदार पटकन मागे सरकले. स्फोट होऊन बॅटरी दुकानदाराच्या बाजूला पडली. दुकानदारानं आग कशीबशी नियंत्रणात आणली. बराच वेळ बॅटरीतून धूर निघत होता. बॅटरीच्या स्फोटामागचं कारण समोर आलेलं नाही. विवोच्या फोनमधील बॅटरी ओरिजनल होती की डुप्लिकेट याबद्दलची माहिती उपलब्ध झालेली नाही. दुर्घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.