controversy Shivaji Maharaj | माझ्या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असा खुलासा प्रसाद लाड यांच्याकडून देण्यात आला. मात्र, या सगळ्या प्रकारामुळे आज सकाळपासून प्रसाद लाड आणि भाजप पक्षाची चांगलीच शोभा झाली. लाड यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांना सरकारला धारेवर धरण्यासाठी आयते कोलीत मिळाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.

हायलाइट्स:
- छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला होता
- किल्ले रायगडावर त्यांचे बालपण गेले
- त्यांनी रायगडावर स्वराज्याची शपथ घेतली
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस राजकारण करण्याचा प्रयत्न करते, त्याचा मी निषेध करतो. स्वराज्य कोकण भूमी या कार्यक्रमात बोलताना स्पष्ट म्हटलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी आणि स्वराज्याची स्थापना कोकणातून झाली. तर, शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असं अनावधाने माझ्याकडून बोललं गेलं. मात्र, माझ्याबाजूला बसलेल्या संजय यादव यांनी चूक शिवनेरीवर जन्म झाला सुधारत सांगितलं. माझ्या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असा खुलासा प्रसाद लाड यांच्याकडून देण्यात आला. मात्र, या सगळ्या प्रकारामुळे आज सकाळपासून प्रसाद लाड आणि भाजप पक्षाची चांगलीच शोभा झाली. लाड यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांना सरकारला धारेवर धरण्यासाठी आयते कोलीत मिळाले आहे.
प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले?
आमदार प्रसाद लाड हे शनिवारी मुंबईतील कोकण महोत्सवात बोलत होत. यावेळी भाषणाच्या ओघात लाड यांनी म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला होता. यानंतर किल्ले रायगडावर त्यांचे बालपण गेले. त्यांनी रायगडावर स्वराज्याची शपथ घेतली, असे लाड यांनी म्हटले होते. त्यावेळी त्यांच्या बाजूला बसलेल्या संजय यादव यांनी प्रसाद लाड यांना ही चूक लक्षात आणून दिली. पण त्यानंतरही त्यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं नाही किंवा अनावधानाने बोललो, असे स्पष्टीकरण दिले नाही. त्यांचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट केला होता. यानंतर राज्यभरात प्रसाद लाड यांच्याविरोधात टीकेची झोड उठली होती.
अमोल कोल्हेंनी सुनावले खडे बोल
प्रसाद लाड यांनी मुक्ताफळे उधळल्यानंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनीही प्रसाद लाड यांच्यावर टीकास्त्र सोडले. लाड यांना चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून किंवा कोणत्याही शिवभक्ताकडून विशेष प्रशिक्षण देण्यात यावे, अशी उपहासात्मक टीका अमोल कोल्हे यांनी केली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.