IND vs BAN : भारताने बांगलादेशची ९ बाद १३६ अशी अवस्था केली होती. त्यामुळे भारत हा सामना जिंकणार, असे वाटत होते. पण शार्दुल ठाकूरच्या एका षटकात हा सामना भारताच्या हातून निसटल्याचे पाहायला मिळाले. शार्दुलच्या एका षटकात असं नेमकं घडलं तरी काय, जेणेकरून सामना जिंकणारा भारत हा पराभूत झाला, जाणून घ्या…

शार्दुलच्या या ४३ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा मेहंदीचा झेल उडाला. पण हा झेल टिपण्यासाठी वॉशिंग्टन सुंदर पुढेच आला नाही. त्यामुळे हा चेंडू मैदानातच पडला. हा झएल जरी सुंदरने पकडला असता तरीदेखील भारताला विजय मिळवता आला असता. पण राहुलनंतर सुंदर हा झेल पकडण्यात अपयशी ठरले आणि शार्दुलच्या या ४३ व्या षटकात सामना बांगलादेशच्या बाजूने फिरल्याचे पाहायला मिळाले. शार्दुलची या षटकात एकही चूक नव्हती. उलट शार्दुलला या षटकात विकेट मिळाली असती आणि भारताला विजय मिळवता आला असता. पण शार्दुलच्या एका षटकात हे दोन्ही झेल सुटले आणि त्यामुळेच भारताला पराभव पत्करावा लागला.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.