Authored by सरफराज सनदी | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 4 Dec 2022, 9:04 pm

Water in Sangli Jath 40 villages | काही दिवसांपूर्वीच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीच्या जत तालुक्यातील ४० गावांचा कर्नाटकात सामील होण्याच्या ठरावाचे स्वागत केले होते. आम्ही या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करू, असे बोम्मई यांनी म्हटले होते. यावरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय लढाई सुरु झाली होती. अशातच आता या गावांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे.

 

Sangli 40 villages
महाराष्ट्र कर्नाटक वाद

हायलाइट्स:

  • टेंडर २० जानेवारी ऐवजी २३ डिसेंबरच्या आत काढावे
  • अन्यथा २४ डिसेंबरला पुढील निर्णय घेऊ
  • शिंदे-फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढली
सांगली: महाराष्ट्र सरकारने सांगलीच्या जत तालुक्यातील ४२ गावांना पाणी देण्यासाठी म्हैसाळ विस्तारीत योजनेचे टेंडर २० जानेवारी ऐवजी २३ डिसेंबरच्या आत काढावे. अन्यथा २४ डिसेंबर रोजी ४२ गावांमधील दुष्काळग्रस्तांची व्यापक बैठक घेऊन पुढच्या आंदोलनाची भूमिका घेऊन कर्नाटक मध्ये जाण्याचा निर्णय घेतला जाईल,असा इशारा पाणी संघर्ष कृती समितीच्या पार पडलेल्या बंद खोलीतल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. तसेच ४२ गावांना पाणी देण्यासाठी टेंडर काढायच्या सरकारच्या भूमिकेला कोणाचा विरोध नसेल,तर येत्या आठवड्यात पार पडणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तात्काळ टेंडर काढण्याचं जाहीर करावे. जेणेकरून कोणत्या पक्षाचे पाणी देण्यासाठी विरोध आहे, हेदेखील आम्हाला समजेल. विरोध नसेल तर मग टेंडर काढायला अडचण नाही. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने २३ तारखेपर्यंत टेंडर काढावे. अन्यथा आता २४ डिसेंबरला कर्नाटकमध्ये सामील होण्याबाबत पुढचा निर्णय आम्ही घेऊ,असा थेट इशारा पाणी संघर्ष कृती समितीकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकार काय पावलं उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ( Sangli Jath district 40 villages final warning to Shinde Fadnavis govt)

गेल्याच महिन्यात या गावांकडून राज्य सरकारला इशारा देण्यात आला होता. मुख्यमंत्री कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यांनी जत तालुक्यातले ४२ गावे कर्नाटकमध्ये येणार असल्याचं विधान केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर स्थानिक नेत्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी जत तालुक्यातील कोणतीच गावा कर्नाटकात जाणार नसल्याचा स्पष्ट केले होते. मात्र, प्रत्यक्षामध्ये ४२ गावातल्या पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पाणी संघर्ष कृती समितीने वेगळी आणि आक्रमक भूमिका घेतली होती.
महाराष्ट्राच्या मंत्र्यांनो कर्नाटकात येऊ नका! सीमाभागात तणाव, २ हजार पोलिसांचा बंदोबस्त

देवेंद्र फडणवीसांचा दावा, एकही गाव कर्नाटकात जाणार नाही

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील ४० गावं आमच्या राज्यात येण्यास इच्छूक असल्याचे सांगितल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील ४० गावांसंदर्भात केलेला दावा फसवा असून महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले होते. जत तालुक्यातील ४० दुष्काळी गावांनी २०१२ साली कर्नाटकमध्ये सामीर होण्याचा ठराव मंजूर केला होता. हा ठराव आत्ताचा नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते. परंतु, या गावांमधील पाणी संघर्ष कृती समितीने आता नव्याने ठराव करून कर्नाटकमध्ये सामील होण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here