Rohit Sharma : रोहित शर्मा पहिला वनडे सामना सुरु असताना चांगलाच भडकला होता. रोहितचा पारा यावेळी चांगलाच चढला होता. पण या रागाच्या भरात रोहित नको ते बोलून गेल्याचे पाहायला मिळाले. कारण रोहितचा हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रोहितने भडकल्यावर नेमकं काय म्हणाला, पाहा खास व्हिडिओ …

भारतासाठी ही गोष्ट सर्वात महत्वाची होती. कारण राहुलने हा झेल पकडला असता तर भारताला विजय मिळाला असता. राहुलने झेल सोडला आणि त्यानंतरच्या चेंडूवर पुन्हा एकदा झेल सुटला. या चेंडूवर कॅच उडाली होती. पण त्यावेळी वॉशिंग्टन सुंदर हा झेल पकडण्यासाठी पुढे आलाच नाही. त्यावेळी रोहितचा पारा चांगलाच चढला होता. रोहित यावेळी चांगलाच रागावला होता. रागाच्या भरात रोहितने यावेळी अपशब्द वापरल्याचेही पाहायला मिळाले.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.