सिंधुदुर्ग प्रतिनिधी: गणेशोत्सवासाठी मुंबईतील चाकरमानी कोकणात निघाले असताना सिंधुदुर्ग जिल्हा हादरला आहे.
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी रात्री उशिरा त्यांचा अहवाल पॉजिटिव्ह आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होतेय. अशातच सोमवारी रात्री शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आमदार वैभव नाईक हे या कोरोनाच्या स्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषतः कुडाळ आणि मालवण या त्यांच्या मतदारसंघात नेहमी प्रवास करत असतात. सिंधुदुर्गनगरीमध्येही विविध बैठकांसाठी त्यांचा प्रवास असतो.

आमदार वैभव नाईक यांना भेटणाऱ्यांची संख्या ही फार मोठी असते. यामुळे आमदार वैभव नाईक यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा तसेच नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. आमदार वैभव नाईक यांचा जनसंपर्क फार मोठा असल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे हे आरोग्य यंत्रणे समोर आता आव्हान निर्माण झाले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here