विशेष म्हणजे, दोन महिला ‘जीने के बहने लाखों… और प्यार करते हैं…’ या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. या दोन्ही महिला सुरक्षा कर्मचारी आहेत. त्यांचा व्हिडिओ व्हायरल होताच एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची दखल घेत मंदिर प्रशासनाने कडक भूमिका घेत दोन्ही महिला कामगारांची ओळख पटवली.
दरम्यान, मंदिरात तैनात सुरक्षा कर्मचारी पूनम सेन आणि वर्षा नवरंग यांनी हा व्हिडिओ बनवल्याचे समजले. प्रशासकाने दोघांनाही तत्काळ प्रभावाने सेवेतून काढून टाकले आहे. या संपूर्ण प्रकरणावर उज्जैनचे एसडीएम संतोष टागोर म्हणाले की, महाकाल मंदिराच्या दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मंदिरातच बॉलिवूड गाण्यांवर नाचतानाचा व्हिडिओ अपलोड केल्याची माहिती माध्यमांद्वारे मिळाली होती. याप्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.
गर्भगृह आणि नंदी हॉलमध्ये मोबाईलवर बंदी
याआधीही मंदिरातील अनेक लोकांनी असे व्हिडिओ बनवून शेअर केले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे गर्भगृह आणि नंदी हॉलमध्ये मोबाईलवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, आता मंदिरात तैनात असलेले सुरक्षा कर्मचारीच बॉलिवूड गाण्यांवर व्हिडिओ बनवत आहेत. असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत.