मुंबई: गेल्या आठवड्यात नव-नवा विक्रम नोंदवणाऱ्या शेअर बाजाराने आठवड्याच्या शेवटी यू-टर्न घेतला आणि गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळाले. आपल्या ऐतिहासिक कामगिरीत सेन्सेक्सने पहिल्यांदाच ६३ हजार अंकाचा टप्पा पार केला तर बाजाराच्या शेवटच्या दिवशी बाजार ४०० अंकाने घसरला. मागील सत्रातील विक्रमी उच्चांकी पातळी गाठल्यानंतर शुक्रवारी बाजार लाल चिन्हासह बंद झाला. अशाप्रकारे आठ सत्रांच्या वाढीनंतर शुक्रवारी बाजारात घसरणी झाली. कमकुवत जागतिक ट्रेंडमुळे शेअर बाजार घसरला. यूएस पेरोल डेटाच्या आधी त्यांच्या नफ्याचे रक्षण करणे गुंतवणूकदारांना योग्य वाटले. हा डेटा यूएस फेडरल रिझर्व्हच्या दर वाढीच्या योजनांमध्ये बदल दर्शवतील.

आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४१५ अंकांनी घसरून ६२,८६८.५० वर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ११६ अंकांनी घसरून १८,६९६ वर बंद झाला.

गुंतवणूकदारांमध्ये या IPO ची क्रेझ, तिसऱ्या दिवशी २५ पट सबस्क्राइब; ग्रे बाजारातही बोलबाला
कोणत्या समभागांमध्ये सर्वात मोठी घसरण
शुक्रवारी व्यवहारादरम्यान, सेन्सेक्स कमाल ६३,१४८.५९ अंकांवर आणि किमान ६२,६७९.६३ अंकांवर गेला. यावेळी सेन्सेक्समधील ३० पैकी ९ समभाग हिरव्या चिन्हावर तर २१ लाल चिन्हावर बंद झाले. सर्वाधिक वाढ टाटा स्टीलमध्ये १.२२ टक्के आणि डॉ रेड्डीजमध्ये १.१८ टक्क्यांनी नोंदवली गेली. तसेच महिंद्रा अँड महिंद्रा आणि एचयूएलमध्ये सर्वाधिक घसरण नोंदवली गेली. दुसरीकडे, निफ्टीच्या ५० समभागांपैकी १८ शेअर्स हिरव्या चिन्हावर, ३१ शेअर्स लाल चिन्हावर आणि एक शेअर कोणत्याही बदलाशिवाय बंद झाला.

शेअर बाजाराची घोडदौड थांबली; मार्केट उघडताच सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पाहा अपडेट
बाजारात घसरण चांगले संकेत
आयडीबीआय कॅपिटलचे संशोधन प्रमुख एके प्रभाकर म्हणाले, “अमेरिकन बाजारातील घसरण हे भारतीय शेअर बाजारातील घसरणीचे मुख्य कारण आहे. विक्रीच्या दबावाचे आणखी एक कारण म्हणजे कमी कामगिरी करणारे ऑटो स्टॉक्स आणि खाजगी बँका. एकूणच, सध्या सुरू असलेल्या तेजीमुळे बाजाराने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ते चांगले काम करत आहे आणि आता मिड आणि स्मॉलकॅप्स कामगिरी करत आहेत, पूर्वी असे नव्हते. या प्रकारची प्रॉफिट बुकींग ऑल टाइम हाय नॉर्मल आहे. ८-९ दिवसांच्या वाढीनंतर काही घसरण ठीक आहे.”

टाटाचा शेअर चमकणार! गुंतवणूकदारांना जबरदस्त परताव्याची शक्यता, टार्गेट प्राईस पाहा
विदेशी गुंतवणूकदारांमुळे बाजार विक्रमी पातळीवर
सेन्सेक्स आणि निफ्टी या बेंचमार्क निर्देशांकांनी गेल्या आठवड्यात विक्रमी उच्चांक गाठला आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) भारतीय बाजारात केलेल्या बंपर खरेदीमुळे शेअर बाजारात ऐतिहासिक तेजी पाहायला मिळाली.

आता निफ्टी १९ हजाराची पातळी गाठेल
गौरव रत्नपारखी, शेअरखानच्या टेक्निकल रिसर्चचे प्रमुख म्हणाले की, “गेल्या काही सत्रांमध्ये १८६०० ते १८७०० चा अडथळा पार केल्यानंतर निर्देशांकात नवीन गती दिसून येत आहे.” ते पुढे म्हणाले, “दर तासाला आणि रोजच्या अप्पर बोलिंगर बँडचा प्राइस ॲक्शनमुळे विस्तार झाला आहे. त्यामुळे बाजारला मदत झाली. अशाप्रकारे निफ्टी १९ हजाराच्या पातळीवर पोहोचण्यासाठी तयार आहे. दुसरीकडे, नीचांकी पातळीकडे पहिले तर १८,७०० ते १८,६०० हा निफ्टीचा शॉर्ट टर्म बेस बनला आहे. त्यामुळे, सपोर्ट झोनच्या खाली या शॉर्ट टर्म तेजीच्या स्थितीसाठी एक उलट दिसू शकतो.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here