पुणे: शहर जिल्ह्यात सोमवारी २६०१ जणांना संसर्गाची लागण झाली असून शहर जिल्ह्यातील ही एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली आहे. पुणे शहरात सुरू असलेल्या अन्टीजेन चाचणीमुळे शहरातील रुग्णसंख्या वाढल्याचे चित्र आहे. एकूणच रुग्णसंख्या वाढल्याने गंभीर रुग्णांच्या संख्येतही भर पडत आहे. आज ८३० जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून शहर जिल्ह्यात ४४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ( )

वाचा:

शहरातील चाचण्यांची संख्या सात हजारापर्यंत पोहोचली असून एकूण चाचण्यांची संख्या दोन लाख ९ हजार २२२ एवढी झाली आहे. शहरातील गंभीर रुग्णांची संख्याही वाढत असून ५९१ जण गंभीर आहेत. त्यापैकी ९६ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ४९५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. शहरात सोमवारी सर्वाधिक बरे झालेले रुग्ण घरी परतले असून ती संख्या ८३० एवढी आहे. तर आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २३ हजार ४४१ एवढी झाली आहे. अॅक्टिव्ह रुग्ण १४ हजार ७५७ एवढे झाले आहेत. शहर जिल्हयात ४४ जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत मृतांची संख्या १३९१ एवढी झाली आहे. पुण्यात अन्टीजेन चाचण्यांमुळे रुग्णसंख्या वाढत असून पिंपरीतही वाढ झाल्याचे दिसत आहे.

वाचा:

शहरात काळत २६ हजार जणांवर कारवाई

लॉकडाऊन केल्यापासून पुणे शहरात आतापर्यंत २६ हजार ५२६ जणांनी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, ३६ लाख ७५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच, ३५ हजार वाहने देखील जप्त केली होती. करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून २४ मार्च २०२० रोजी देश लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात पुणे शहरात देखील संचारबंदी करण्यात आली होती. करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून पोलिस आदेश धुडकावून विनाकारण फिरणारे, मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई केली जात होती. तसेच, अशा नागरिकांची वाहने देखील जप्त केली जात होती. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये म्हणून वेळोवेळी आवाहन देखील केले जात होते. पण, नागरिक ऐकत नसल्यामुळे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केली. मात्र, लॉकडाऊनचे नियम शिथील केल्यानंतर ही कारवाई कमी केली होती. मात्र, शहरात पुन्हा करोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्यामुळे दहा दिवस पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी मार्च महिन्यात लॉकडाऊन लागू केल्यापासून आतापर्यंत भारतीय दंड संहिता १८८ नुसार २६ हजार ५२६ जणांवर कारवाई केली आहे. तसेच, ३५ हजार ६३२ वाहने जप्त केली होती. पण, नंतर ही वाहने सोडण्यास सुरवात केली. यापैकी ३४ हजार ९८७ वाहने पुन्हा सोडण्यात आली आहेत. तर, ३६ लाख ७५ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. सर्वाधिक प्रतिबंधात्मक कारवाई झोन तीनच्या हद्दीत करण्यात आली आहे. या ठिकाणी नऊ हजार ९०१ जणांवर भारतीय दंड संहिता १८८ नुसार कारवाई करण्यात आली आहे. तर, सर्वाधिक वाहने झोन चारच्या हद्दीत जप्त करण्यात आली आहेत. या ठिकाणी नऊ हजार ८६४ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

वाचा:

जिल्हा परिषदेत सर्वांची करोना चाचणी

पुणे जिल्ह्यातील करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा कार्यरत असताना जिल्हा परिषदेच्या एका सदस्यासह कर्मचाऱ्याला लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांची आज, मंगळवारी चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी याबाबतची माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात एक सदस्य आणि काही कर्मचारी करोनाची लागण झाल्याचे नुकतेच निदान झाले. मात्र संबंधित जिल्हा परिषद सदस्य एका बैठकीसाठी जिल्हा परिषदेत आले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अनेक विभागात फिरल्याने खबरदारी म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचा-यांची मंगळवारी करोना चाचणी करण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सांगितले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here