नवी दिल्ली: ओपेक प्लस देशांनी सध्याच्या कच्च्या तेलाच्या उत्पादनात कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमधील कच्च्या तेलाच्या घटत्या मागणीमुळे ओपेक प्लस देश कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करू शकतात, असे बोलले जात होते. २३ देशांच्या संघटनेने ऑक्टोबर महिन्यात दररोज २० लाख बॅरलची प्रचंड कपात करण्याचा निर्णय घेतला होता, जी सध्या सुरूच राहणार आहे. मात्र, ही कपात सुरूच राहिल्याने भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये होणारा बदल याबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही.

वाहनधारकांसाठी गुड न्यूज… पेट्रोल-डिझेलचे भाव घटणार? इंधन दरांबाबत मत्त्वाचे अपडेट
चीनमधील मागणी कमी झाल्याचा परिणाम
चीनमधील सरकारच्या शून्य कोविड धोरणामुळे उद्योगांच्या कामावर परिणाम झाल्यामुळे क्रूडच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. चीन जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार आहे. कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात न करण्याचा निर्णय युरोपियन युनियन आणि जी-७ मधील देशांनी रशियन तेलावर प्रति बॅरल ६० डॉलरची किंमत लादण्याचे मान्य केले आहे. सध्याच्या वृत्तानुसार, हा निर्णय सोमवार, ५ डिसेंबरपासून लागू होणार आहे.

HDFC बँक ग्राहकांनो इकडे द्या लक्ष! बँकेचे क्रेडिट कार्ड महागणार, नव्या वर्षात खिसा करायला तयार व्हा
युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियावर विविध निर्बंध लादले आहेत. आता तेलाच्या किंमतीवर मर्यादा घालून या देशांना रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत बनवायचे आहे. रशिया आपल्या तेलाची निर्यात करून मोठी कमाई करत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील कोणतेही बदल दररोज सकाळी ६ वाजता अपडेट केले जातात.

कच्च्या तेलाच्या किमती
आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी देखील कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. सोमवारी ब्रेंट क्रूडचा दर २.०८ टक्क्यांनी वाढून ८७.३५ डॉलरवर पोहोचला आहे. त्याच वेळी, WTI क्रूडचा दर २.०६ टक्क्यांनी वाढून ८१.६३ डॉलरवर पोहोचला. दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर आजही स्थिरावले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला तेलाच्या किमतीत वाढ झाली होती. तर २२ मे २०२२ रोजी सरकारने इंधनावरील केंद्रीय उत्पादन शुल्क (व्हॅट) कमी करण्याचा निर्णय घेतला होता. पेट्रोल-डिझेलच्या दरांत २४३ दिवसांपासून कोणताही बदल झालेला नाही. २२ मे रोजी केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर मुंबईत पेट्रोल १०६.३१ प्रति लिटर तर डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर दरांत उपलब्ध आहे.

महागाईने रडकुंडीला आणलं! साखर, दूध, तांदळाने नागरिकांचे ‘तेल’ काढले; पाहा काय आहेत दर
भारत रशिया मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो. रशिया-युक्रेन युद्धापूर्वी जिथे भारत रशियाकडून फक्त १० टक्के तेल खरेदी करत होता, तर आता हा आकडा २० टक्क्यांवर पोहोचला आहे. रशियाच्या स्वस्त तेलामुळे भारतीय तेल शुद्धीकरण कंपनी जगभर फायदेशीर ठरत आहे.

मुंबईतील इंदानाचे दर
मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लीटर आहे. इंधन दरांमध्ये शेवटचा देशव्यापी बदल या वर्षी २१ मे रोजी झाला होता, जेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इंधनावरील उत्पादन शुल्क प्रति लीटर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपये प्रति लिटर कपात जाहीर केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here