मुंबई: नवीन आठवड्याची सुरुवात झाली आहे आणि शेअर बाजाराची आज सावध सुरुवात झाली. सेन्सेक्स लाल चिन्हावर उघडला, तर निफ्टी ५० किंचित वाढून हिरव्या चिन्हावर उघडला. बीएसईचा ३० समभागांचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स सोमवारी १०० पेक्षा अधीन अंकांनी घसरला. त्याच वेळी, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने २३ अंकांनी वाढून १८,७१९ च्या पातळीवर दिवसाच्या व्यवहाराला सुरुवात केली.

दिवसाच्या सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १३८ अंकांनी घसरून ६२,७२९ वर राहिला, तर निफ्टी १४ अंकांनी घसरून १८,६७० वर होता. ओएनजीसी, हिंदाल्को, टाटा स्टील, अल्ट्राटेक आणि जेएसडब्ल्यू स्टील हे निफ्टी टॉप गेनर्समध्ये होते तर एचडीएफसी, रिलायन्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स आणि एसबीआय लाइफ हे टॉप लूसर होते.

बाजारात तेजीची हवा फूस; गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळाले.. शेअर मार्केटमध्ये पुढे काय होणार?
कोणत्या क्षेत्रात तेजी, कोणत्या क्षेत्रात घसरण

बँकिंग, PSU बँका, खाजगी बँका आणि मीडिया, रियल्टी समभागांसह धातू आज संथ गतीच्या बाजारात ताकद दाखवत आहेत. तर घसरणाऱ्या सेक्टरमध्ये ऑटो, फायनान्शिअल सर्व्हिसेस, आयटी, फार्मा, एफएमसीजी, हेल्थकेअर इंडेक्स, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि ऑइल अँड गॅस या शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली.

सुरुवातीच्या १० मिनिटांची स्थिती
उघडण्याच्या १० मिनिटांच्या आत सेन्सेक्स लाल चिन्हात आहे आणि ९७.३४ अंकांच्या किंवा ०.१५ टक्क्यांच्या घसरणीसह ६२,७७१ वर व्यापार करत आहे. सेन्सेक्सच्या ३० पैकी १२ समभाग तेजीत तर १८ समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत. त्याच वेळी एनएसईचा निफ्टी देखील लाल चिन्हात असून सध्या निर्देशक २५.५० अंकांनी म्हणजेच ०.१४ टक्क्यांनी घसरल्यानंतर १८,६७० च्या पातळीवर आहे. निफ्टीच्या ५० समभागांपैकी २० वाढले आणि ३० घसरले आहेत.

गुंतवणूकदारांमध्ये या IPO ची क्रेझ, तिसऱ्या दिवशी २५ पट सबस्क्राइब; ग्रे बाजारातही बोलबाला
शेअर बाजाराची सुरुवात
आज आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात संमिश्र व्यवसाय पहायला मिळत आहे. बीएसईचा सेन्सेक्स ३.२२ अंकांनी जवळपास सपाट सुरुवातीसह ६२,८६५.२८ च्या पातळीवर व्यवहार करत असून एनएसईचा निफ्टी २३.४५ अंकांच्या म्हणजेच ०.१३ टक्क्यांच्या वाढीसह १८,७१९.५५ च्या पातळीवर उघडला आहे.

सीरम इन्स्टिट्यूट बाजारात सूचिबद्ध नसणारी सर्वात मौल्यवान; बायजू, NSE यांचाही समावेश
रिझर्व्ह बँकेच्या निर्णयावर बाजाराची नजर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) व्याज दरांबाबतचा निर्णय या आठवड्यात प्रामुख्याने स्थानिक शेअर बाजारांची दिशा ठरवेल, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक आजपासून सुरू होणार असून, तीन दिवसीय एमपीसी बैठक ७ डिसेंबर रोजी पूर्ण होईल. म्हणजेच ७ डिसेंबरला आरबीआय आपले आर्थिक धोरण जाहीर करणार करेल, ज्यामध्ये रिझर्व्ह बँक रेपो दर वाढवते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here