नवी दिल्ली : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह (आरबीआय) रेपो दरात वाढ करू शकते. गेल्या महिन्यात देशात महागाईचा दर कमी झाला असला, तरी लोकांना रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात सवलत मिळण्याची अपेक्षा आहे, परंतु सध्या तरी दिलासा अपेक्षित नाही हे जाणून तुमची निराशा होईल. आजपासून सुरू होणाऱ्या चलनविषयक आढावा बैठकीत (एमपीसीस बैठक) महागाई कमी होण्याची चिन्हे दिसल्यानंतरही रिझर्व्ह बँक व्याजदरात वाढ करू शकते.

वर्षाखेरीस जर तुम्ही घर घेण्यासाठी गृहकर्ज घेण्याची तयारी करत असाल तर तुम्हाला आणखी एक धक्का बसू शकतो. डिसेंबरच्या चालविषयक समितीच्या बैठकीत रिझर्व्ह बँक पुन्हा दर वाढवण्याची शक्यता आहे. महागाईचा दर कमी झाला असला तरी ती अजूनही आटोक्यात आलेली नाही त्यामुळे, ७ डिसेंबर रोजी होणार्‍या आरबीआयच्या बैठकीत रेपो दरात वाढ केली जाईल.

दिलासादायक बातमी! जगातील वाढत्या महागाईला ब्रेक लागणार, माजी RBI गव्हर्नरने सांगितले कसं ते
गेल्या तीन वेळा समितीने रेपो दरात ५० बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेची पतधोरण आढावा बैठक सोमवारपासून सुरू होत असून, तीन दिवस चालणार आहे. या बैठकीबाबत यंदा महागाईचा दर नरमला असला तरी आरबीआय व्याजदरात २५ ते ३० आधार अंकांनी वाढ करू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यापूर्वी आरबीआयने सलग तीन वेळा व्याजदरात ५० बेस पॉइंट्सने वाढ केली. अशा परिस्थितीत बुधवारी आरबीआयच्या घोषणेकडे कर्जदाराचे लक्ष लागून असेल. मे ते सप्टेंबर दरम्यान, आरबीआयचा रेपो दर १.९० टक्क्यांनी वाढला आहे.

शेअर बाजाराची सावध सुरुवात; उघडताच सेन्सेक्स १०० पेक्षा अधिक अंकांनी घसरला, आजपासून RBI ची महत्त्वाची बैठक
ईएमआयचं ओझं वाढणार
रेपो दरात वाढ झाल्याचा थेट परिणाम कर्जदारांच्या व्याजदरांवर होईल आणि कर्जाचं ईएमआय वाढेल. विशेष म्हणजे जानेवारीपासून महागाई दर ६ टक्क्यांच्या वर पोहोचला आहे, जो रिझर्व्ह बँकेच्या मर्यादा पातळीपेक्षा अधिक आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी आरबीआय सातत्याने रेपो दरात बदल करत असून गेल्या दीड वर्षांत रेपो दरात सातत्याने वाढ होत आहे. आरबीआयने मे महिन्यापासून रेपो दरात वाढ केली आहे. रेपो दर सध्या ५.९०% वर पोहोचला आहे. यादरम्यान सप्टेंबरमध्ये महागाई दर ५ महिन्यांतील उच्चांकी ७.४१ टक्के होता. मात्र, ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई ६.७७% या तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरली आहे. त्यामुळे नक्कीच काहीसा दिलासा मिळेल असे अपेक्षित आहे.

जबरदस्त! आरबीआयचा नवीन नियम, तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर एकदा वाचाच
चलनविषयक धोरण ठरवण्यासाठी आरबीआय CPI म्हणजेच ग्राहक किंमत निर्देशांक विचारात घेते. रेपो दर आणि तुमचा ईएमआय एकमेकांशी जोडलेला आहे. आरबीआयने रेपो दर वाढवताच बँका कर्जाचे व्याजदर वाढवतात परिणामी तुमचा ईएमआय वाढतो. रेपो दरानुसार रिझर्व्ह बँक अन्य बँकांना कर्ज देते. दुसरीकडे, रिव्हर्स रेपो रेटवर आरबीआय बँकांना पैसे ठेवण्यासाठी व्याज देते. रेपो दर घसरला तर कर्जाचे व्याजदर कमी होते आणि रेपो दर वाढला तर व्याजदर वाढतात आणि ईएमआयही वाढतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here