मुंबई: ‘अनलॉक’मध्ये सर्व काही सुरू होत असताना राम मंदिराच्या भूमिपूजनाला काय हरकत आहे?, असा प्रश्न विचारत भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांना आज लक्ष्य केले. ( Slams )

वाचा:

अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी ५ ऑगस्टचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यावरून राजकारण तापलं असून शरद पवार यांनी करोनाच्या संकटात होत असलेल्या या भूमिपूजनावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. यावरून अनेक भाजप नेत्यांनी पवारांना लक्ष्य केलं असून आज चंद्रकांत पाटील यांनीही पवारांवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली.

‘ हा हिंदूच्या अस्मितेचा विषय आहे आणि देशातला वा जगातला हिंदू पवारांसारखी व्यक्ती काय म्हणते याची पर्वा करत नाही’, असे विधान करत पाटील यांनी पवारांना लक्ष्य केले. प्रत्येक विषयात खोडा घालायचा. त्याला वेगळे फाटे फोडायची ही पवारांना सवयच झाली आहे. त्या सवयीतूनच त्यांना राम मंदिराबाबत असे विधान केले आहे, असेही पाटील म्हणाले. पवारांवर टीका करताना त्यांनी काँग्रेस नेते यांच्या एका विधानाचा संदर्भ देत कौतुक केले. राम हे आदर्श पुरुष होते, यावर हिंदू आणि मुसलमानांचे एकमत आहे. मुसलमानांची ही मानसिकता असेल तर नेमकी पवारांना अडचण काय?, असा सवाल पाटील यांनी केला.

वाचा:

अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख जाणार का?, उद्धव यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले जाणार का?, असे अनेक प्रश्न सध्या चर्चेत आहेत. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी भूमिपूजनाला जायला हवे, असा भाजपचा आग्रह असल्याचे पाटील म्हणाले. ‘पहले मंदिर फिर सरकार’ या उद्धव ठाकरे यांच्या घोषणेचा उल्लेख करत तुमचं सरकार कसंही आलं असलं तरी नव्या मित्रांना काय वाटेल याचा विचार न करता तुम्ही अयोध्येला जायला हवं. सरकारमध्ये राहणं ही नव्या मित्रांची मजबुरी असल्याने ते काहीच बोलणार नाहीत, असा खोचक सल्लाही पाटील यांनी दिला.

वाचा:

राम मंदिराचं भूमिपूजन आणि करोना या दोन बाबी भीन्न असल्याचे सांगत करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वकाही करत असल्याचे पाटील यांनी नमूद केले. गेल्या साडेतीन महिन्यात केंद्राने उभारलेल्या सुविधा, आर्थिक पॅकेज अशा अनेक गोष्टींकडे पाटील यांनी बोट दाखवले.

काय म्हणाले होते पवार?

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी ५ ऑगस्ट ही तारीख केंद्र सरकारकडून निश्चित झाल्यानंतर शरद पवार यांनी त्यावर भाष्य केलं होतं. ‘कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं ते ठरवलं पाहिजे. आम्हाला वाटतं करोना थांबवला पाहिजे आणि काहींना वाटतं की मंदिर बांधून करोना जाईल’ असा टोला शरद पवार यांनी मोदी सरकारला लगावला होता.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here