नवी दिल्ली : शास्त्रज्ञांना अलीकडेच एक नवीन एक्सोप्लॅनेट (Exoplanet) सापडला आहे. पण जेव्हापासून खगोलशास्त्रज्ञांना या ग्रहाचा आकार आणि प्रकार कळला आहे, तेव्हापासून ते गोंधळून गेले आहेत. या ग्रहाचे नाव HD-114082b आहे. हा एक नवीन ग्रह आहे ज्याचा आकार गुरू एवढा मोठा आहे. त्याचे मोजमाप केल्यानंतर, शास्त्रज्ञांना असे समजले की, या ग्रहाचे गुणधर्म वायू ग्रह निर्मितीशी संबंधित दोन मॉडेलपैकी कोणत्याही मॉडेलशी जुळत नाहीत. म्हणजेच हा ग्रह खूप जड असून त्याची निर्मिती कशी झाली हे अजूनही कोडेच आहे.
जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर अॅस्ट्रॉनॉमीच्या खगोल भौतिकशास्त्रज्ञ ओल्गा झाखोझाय (Olga Zakhozhay) म्हणतात की, सध्याच्या मॉडेल्सच्या तुलनेत, एचडी-114082b या वायू महाकाय ग्रहाचे वय फक्त १५ दशलक्ष वर्षे आहे, जे तरुण ग्रहाच्या वयाच्या दोन ते तीन पट जास्त आहे. ‘सर, आई तीन दिवसांनी…’, सुट्टीसाठी शिक्षकाने लिहिला विचित्र अर्ज; सोशल मीडियावर तुफान व्हायर हा एक्सोप्लॅनेट वयानुसार खूप मोठा आहे….
जर्नल ऑफ अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, HD-114082b सुमारे ३०० प्रकाश-वर्ष दूर आहे. हा आतापर्यंत शोधलेल्या सर्वात तरुण एक्सोप्लॅनेटपैकी एक आहे. त्याचे गुणधर्म समजून घेतल्यावर ग्रह कसे तयार होतात हे कळू शकते. ही एक प्रक्रिया आहे जी अद्याप पूर्णपणे समजलेली नाही.
याचे वस्तुमान गुरूच्या ८ पट आहे
संशोधकांनी सुमारे चार वर्षे HD-114082 चा रेडियल वेग डेटा गोळा केला. ट्रान्झिट डेटा आणि रेडियल वेग डेटा वापरून, संशोधकांना आढळले की HD-114082b ची त्रिज्या बृहस्पतिसारखीच आहे, परंतु त्याचे वस्तुमान बृहस्पतिच्या आठ पट आहे. याचा अर्थ असा की एक्सोप्लॅनेटची घनता पृथ्वीच्या दुप्पट आणि गुरूच्या घनतेच्या सुमारे १० पट आहे.