मुंबई: शेअर बाजारात सूचीबद्ध काही कंपन्या त्यांच्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा देत आहेत. या यादीत टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेडचा (टीटीएमएल) हिस्साही समाविष्ट आहे. जानेवारी २०२२ मध्ये सर्वकालीन उच्चांक गाठल्यानंतर, टाटा समूहाचा समभाग विक्रीच्या दबावाखाली दिसत असला तरी त्याने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

रेल्वे सुपरफास्ट धावणार, महिन्याभरात शेअर्समध्ये आली जबरदस्त तेजी! गुंतवणुकपूर्वी जाणून घ्या
अवघ्या ३ वर्षांच्या कालावधीत स्टॉकने २.५० ते १०० रुपयांपर्यंत प्रवास केला आहे, म्हणजे गुंतवणूकदारांना ३,९०० टक्के मजबूत परतावा मिळाला आहे. येथे आपण टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच टीटीएमएलबद्दल बोलत आहोत. टाटा समूहाच्या समभागाने या वर्षी जानेवारीमध्ये २९१ रुपयांच्या सर्वकालीन उच्चांक नोंदवला.

बाजारात तेजीची हवा फूस; गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळाले.. शेअर मार्केटमध्ये पुढे काय होणार?
२०२२ मध्ये शेअर्समध्ये ५०% घसरण
टाटा समूहाचा टेलिकॉम स्टॉक गेल्या सहा महिन्यांत १२२ रुपयांवरून १०० रुपयांपर्यंत घसरला आहे. अशा प्रकारे, या कालावधीत स्टॉक जवळपास २० टक्क्यांनी घसरला आहे. तथापि, जर वर्ष २०२२ बद्दल बोलायचे झाले तर, या वर्षी आतापर्यंत हा स्टॉक जवळपास ५० टक्के घसरला आहे आणि २१५ रुपयांवरून १०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. याशिवाय गेल्या वर्षभरात स्टॉकमध्ये २० टक्क्यांनी घसरण नोंदवली गेली आहे. तसेच गेल्या नऊ महिन्यांतील घसरण असूनही, या समभागाने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे.

गुंतवणूकदारांमध्ये या IPO ची क्रेझ, तिसऱ्या दिवशी २५ पट सबस्क्राइब; ग्रे बाजारातही बोलबाला
तीन वर्षांत छप्परफाड परतावा
गेल्या दोन वर्षात टीटीएमएल शेअर ७.५५ रुपयांवरून १०० रुपयांपर्यंत वाढला आहे. म्हणजेच तितक्या कालावधीत समभागाने १,२०० टक्के परतावा दिला आणि तीन वर्षांच्या कालावधीत, हा मल्टीबॅगर स्टॉक २.५० पासून १०० रुपयांपर्यंत वाढला आहे. अशा प्रकारे, समभागाने तीन वर्षांत ३,९०० टक्के परतावा दिला आहे. अशा प्रकारे, जर एखाद्या भागधारकाने २०२२ च्या सुरुवातीला या स्टॉकमध्ये १ लाख रुपये गुंतवले असतील तर त्याची रक्कम ५०,००० रुपयांपर्यंत खाली घसरली असती. पण ज्या गुंतवणूकदाराने दोन वर्षांपूर्वी या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवले होते ते आज १३ लाख रुपये झाले असतील.

दुसरीकडे, सुमारे तीन वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तर ही रक्कम आज सुमारे ४० लाख रुपयांपर्यंत वाढली असती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here