जयपूरः राजस्थानमधील सत्तासंघर्षात सोमवारी ( ) मोठ्या घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री अशोक गहलोत () यांनी बंडखोर नेते ( ) यांच्यावर घणाघाती टीका केली. तर दुसरीकडे ३५ कोटींची ऑफर दिल्याच्या गहलोत गटातील आमदाराचा आरोप फेटाळून लावत सचिन पायलट यांनी मौन सोडले. पण ज्या आमदारांसाठी हा संघर्ष सुरू आहे त्यांची मनस्थिती काय आहे? हे समोर आलं नव्हतं. आम्ही भाजपमध्ये जाणार नाही, असं पायलट समर्थक आमदार मुकेश भाकर यांनी सांगितलंय. तर हा संघर्ष फक्त राज्यातील नेतृत्वात बदल करून पक्ष वाचवण्यासाठी आहे, असं ते म्हणाले.

भाकर हे राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील लाडनू मतदारसंघाचे आमदार आहेत. राज्यातील काँग्रेस पक्षाला वाचवण्यासाठी वरिष्ठ नेतृत्वाने सरकारचे नेतृत्व बदलायला हवे, असं भाकर म्हणाले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर भाकर यांनी जोरदार टीका केली होती. यामुळे त्यांना युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं होतं. एकही आमदार भाजप शासित हरणायात नाहीए. आम्ही सर्व दिल्लीत आहोत, असं भाकर यांनी स्पष्ट केलं.

पायलट गटातील आमदारांना आमिष दाखवण्याचे प्रयत्न

दिल्लीत आपण आपल्यासोबत असलेले १७ आमदार दिल्लीत कुठे आहेत, याची माहिती मात्र भाकर यांनी दिली नाही. आपल्याला सचिन पायलट यांनी भाजप प्रवेशासाठी ३५ कोटींची ऑफर दिल्याचा आरोप काँग्रेस आमदार गिरीराज सिंह मलिंगा यांनी केला. हे आरोप भाकर यांनी फेटाळून लावले. तसंच गहलोत गटाकडून पायलट समर्थक आमदारांना गहलोत यांना पाठिंबा देण्यासाठी मंत्रिपद आणि पैशाचे आमिष दाखवले गेले, असं भाकर म्हणाले. गहलोत गटाकडून अजूनही आपल्याला आणि आपल्या सोबत असलेल्या आमदारांना ऑफर दिली जात आहे, असं भाकर म्हणाले.

पायलट यांना डावलूनही त्याकडे दुर्लक्ष

एकही बंडखोर आमदार भाजपमध्ये जाणार नाहीए. सचिन पायलट यांना पक्षात डावललं जात असल्याचं बंडखोर आमदारांनी काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांच्यासह काही वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली होती. पण त्याकडे सोयिस्करपणे कानाडोळा केला गेला, असं मुकेश भाकर यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here