एमसीएक्सवर सोने ०.४०% किंवा २१६ रुपयांनी वाढून ५४,०६६ रुपये प्रति १० ग्रॅम वर व्यवहार करत होते. पण चांदीचा भाव १.०६% म्हणजेच ७०६ रुपयांनी वाढून ६७,१५५ रुपये प्रति किलो इतका झाला. सोन्याकडे चलनवाढीविरूद्ध बचाव म्हणून पाहिले जाते, जे वाढत्या व्याजदरांना सामोरे जाण्यास सर्वसामान्यांना मदत करते.
यापूर्वी मागील सत्रात फेब्रुवारी करारासाठी असलेल्या सोन्याचा दर ५३,८५० रुपये प्रति १० ग्रॅम होता. त्याचप्रमाणे एप्रिल २०२३ मध्ये डिलिव्हरीसाठीचे सोने ३९७ रुपयांनी किंवा ०.७३ टक्क्यांनी वाढून ५४,५७३ रुपये प्रति १० ग्रॅम इतके होते. मागील सत्रात एप्रिल करारासाठी सोन्याचा दर ५४,१७६ रुपये प्रति १० ग्रॅम होता.
वायदा बाजारात चांदीची किंमत
एमसीएक्सवर, मार्च २०२३ मध्ये डिलिव्हरीसाठी असलेल्या चांदीचा भाव ७१७ रुपयांनी किंवा १.०८ टक्क्यांनी वाढून ६७,१६६ रुपये प्रति किलो झाला. तर मागील सत्रात मार्च कराराच्या चांदीचा भाव ६६,४४९ रुपये प्रति किलो होता. त्याचप्रमाणे मे २०२३ मध्ये डिलिव्हरीसाठीच्या चांदीचा भाव ६९४ रुपये किंवा १.०३ टक्क्यांनी वाढून ६८,०२० रुपये प्रति किलो होता. मागील सत्रात मे कॉन्ट्रॅक्ट चांदीचा भाव ६७,३२६ रुपये प्रति किलो होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत
कॉमेक्सवर फेब्रुवारी २०२३ मध्ये डिलिव्हरीसाठी सोने ०.५३ टक्क्यांनी वाढून १,८१९.२० डॉलर प्रति औंसवर व्यापार करत होते. तर स्पॉट मार्केटमध्ये सोन्याची किंमत ०.५२ टक्क्यांनी वाढून १,८०६.९२ डॉलर प्रति औंस पातळीवर व्यवहार करत होते. दुसरीकडे, कॉमेक्सवर, मार्च २०२३ मध्ये डिलिव्हरीसाठी चांदी ०.७७ टक्क्यांनी वाढून २३.४३ डॉलर प्रति औंस पातळीवर आली. त्याचप्रमाणे, स्पॉट मार्केटमध्ये चांदीची किंमत ०.४७ टक्क्यांनी वाढून २३.२५ डॉलर प्रति औंस झाली.