मुंबई : मुंबईकरांसाठी एक वाईट बातमी आहे. वाढत्या प्रदुषणामुळे आता हवेची गुणवत्ता खराब होत असल्याची माहिती समोर आली आहे. रविवार शहरात हवेची गुणवत्ता खराब झाली असून एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) २९३-खराब आणि ३०१-४०० ‘अत्यंत खराब’ पातळीच्या जवळ पोहोचली होती. ज्यामुळे नागरिकांना श्वसनाच्या समस्याही उद्भवू शकतात.

गेल्या आठवड्यात, ही पातळी २३२ आणि २७० च्या दरम्यान होती आणि दरम्यान ती मध्यम पातळीवरही घसरली होती. “मुंबईचा AQI ‘खराब’ दर्शवण्यात आला आहे. तर पुढील दोन दिवस तो ‘खराब’ राहण्याची शक्यता आहे,” असे SAFAR बुलेटिनमध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या दरम्यान, नागरिकांनी काळजी घेऊन मास्कचा वापर करणं योग्य आहे.

महाकाल मंदिरात महिलांचा फिल्मी गाण्यावर डान्स, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल
रविवारी प्रदुषणाची पातळी घसरण्यामागे मुख्य कारण म्हणजे तापमानात झालेली घट आणि समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांचा कमी वेग यामुळे प्रदूषक धूर, कचऱ्याच्या ढिगाऱ्याला लागलेली आग आणि धूळ वातावरणात तसेच राहतात. यामुळे प्रदुषण वाढल्याची माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे.

नोव्हेंबर ते फेब्रुवारी काळात शहरात सर्वाधिक प्रदूषण वाढते…

हिवाळ्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत मुंबई सर्वात प्रदूषित दिवस असतात. SAFAR च्या गुफ्रान बेगच्या मते, या वर्षी नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा आणि डिसेंबरचा पहिला आठवडा सर्वात प्रदूषित होता, ज्यात AQI गेल्या तीन-चार वर्षांपेक्षा जास्त होता.

नोव्हेंबरच्या दुस-या आठवड्यात मुंबईने दिल्लीपेक्षा जास्त AQI नोंदवला होता, जे जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक आहे. दरम्यान, रविवारी दिल्लीचा AQI 372 नोंदवला गेला.

पृथ्वीपेक्षा दुप्पट मोठा ग्रह सापडला, शास्त्रज्ञही हैराण; मानवाला मिळणार नवीन जागा?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here