नवी दिल्ली : तुम्ही हॉटेल्समध्ये राहायला जा, जेवा, मजा करा पण तुमच्या बिलाची काळजी घ्या. हॉटेलच्या बिलामुळे तुम्हाला तुमची आलिशान कार गमवावी लागू नये म्हणून आम्ही हे सांगत आहोत. असाच प्रकार चंदीगडमधील हॉटेल शिवालिक व्ह्यूमध्ये राहण्यासाठी आलेल्या अश्विनी कुमार चोप्रा आणि रमणिक बन्सल नावाच्या दोन मित्रांसोबत घडला. दोघे या हॉटेलमध्ये रहायला आले होते, दोघांनीही महिनाभर आलिशान खोलीत मस्ती केली. भरपूर खाल्लं, प्याले आणि मजा केली पण जेव्हा बिल भरायची वेळ आली तेव्हा त्यांची अवस्था बिकट झाली. दोघांची मस्ती त्यांना इतकी भारी पडली की त्यांना त्यांची महागडी गाडी गमवावी लागली.

हॉटेलचे १९ लाखाचे बिल
प्रकरण थोडे जुने आहे, पण आता चंदीगड औद्योगिक आणि पर्यटन विकास महामंडळ लिमिटेड (सिटको) ने या प्रकरणी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. २०१८ मध्ये अश्विनी कुमार चोप्रा आणि रमणिक बन्सल, हे दोन पाहुणे त्यांच्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी आले होते, असे सिटकोने आपल्या याचिकेत म्हटले आहे.

Steve Jobs च्या चपलांचा लिलाव, कोटींच्या घरात बोली, असं काय आहे त्यात खास…
दोघांनी हॉटेल शिवालिक व्ह्यूमध्ये खूप मस्ती केली आणि हॉटेलमधील सर्व सुविधांचा आनंद घेतला. पण हॉटेलमधून चेक आऊट करण्याची वेळ आल्यावर हॉटेलने त्यांना १९ लाख रुपयांचे बिल दिले. १९ लाखांचे बिल पाहून दोघांनाही जबर धक्का बसला. सुरुवातीला दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडले आणि बिल भरण्यास सांगितले. दोघांनी पुन्हा हुशारी दाखवत प्रत्येकी सहा लाखांचे तीन धनादेश (चेक) दिले, मात्र तिन्ही धनादेश बाऊन्स झाले.

जप्त प्लास्टिकचा होणार लिलाव; सामग्री विकत घेणाऱ्या कंपनीस ‘हा’ नियम असेल बंधनकारक
आलिशान गाडी गमावली
यानंतर जेव्हा दोघांकडे दोघांकडे कोणताही पर्याय शिल्लक नसताना त्यांनी हॉटेलजवळ त्यांची आलिशान कार गहाण ठेवली. एक शेवरोले क्रूझ आणि दुसरी ऑडी Q3 कार हॉटेलकडे गहाण ठेवली. दोघांची आलिशान गाडी अजूनही हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभी असून १९ लाखांचे बिल भरून लवकरच आपली गाडी परत घेऊन जाईल, असे दोघांनी आश्वासन दिले.

अकराशे वाहने मोडीत काढणार; पुण्यात जप्त वाहनांचा लिलाव सुरु
या घटनेला पाच वर्षे उलटूनही दोघेही अजूनही त्यांची आलिशान गाडी घेण्यासाठी परतले नाहीत. म्हणजेच १९ लाखांच्या बिलामुळे दोघा मित्रांनी आपली महागडी गाडी गमावली, असे बोलले तर चुकीचे ठरणार नाही. दर्म्य दोन्ही गाड्यांच्या किमतीची तुलना केली तर क्रूझची किंमत १३.३८ लाख रुपये आणि ऑडीची किंमत ४४.८९ लाख रुपये आहे. म्हणजेच हॉटेलचे १९ लाखांचे बिलातून सुटण्यासाठी दोघांनी ५८.२७ लाख रुपयांची गाडी गमावली आहे.

हॉटेलचे हवेत लिलावाचे अधिकार
दोघे मित्र अजूनही पैसे भरून गाडी घेण्यासाठी आले नाही त्यामुळे त्या दोन्ही आलिशान कार ही कार गेल्या पाच वर्षांपासून हॉटेलच्या पार्किंगमध्ये आहेत. अशा परिस्थितीत, हॉटेल बिलाची थकबाकी भरून गाड्या परत नेण्यासाठी हॉटेलने दोघांकडे अनेकदा संपर्क साधला मात्र, वारंवार प्रयत्न करूनही कोणताही निकाल न लागल्याने हॉटेलने आता न्यायालयात धाव घेतली. हॉटेलने दोन्ही वाहनांचा लिलाव करण्याचे अधिकार मागितले, जेणेकरून त्यांचे नुकसान भरून काढता येईल. येत्या ७ जानेवारी २०२३ रोजी न्यायालयात प्रकरणाचा निकाल देणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here