हिंगोली : सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यभरात बैलगाडी शर्यती सुरू झाल्या. मात्र या बैलगाडी शर्यतीमध्ये सहभागी झालेल्या हिंगोलीच्या एका शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक, आजेगाव शिवारामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने दोन दिवसीय बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या बैलगाडा शर्यतीमध्ये हा प्रकार घडला आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांनी अचानक आरडाओरड सरू केल्याने या शेतकऱ्याचे बैलांवरील नियंत्रण सुटले. याचमुळे हा प्रकार घडल्याचे आयोजकांकडून सांगितले जात आहे.

घटनेनंतर बैल जंगलात पळून गेले

विशेष म्हणजे बैलगाडी शर्यतीमध्ये हा शेतकरी कोसळल्यानंतर या शेतकऱ्याचे स्पर्धेत धावणारे बैल देखील जंगलात पळून गेले आहेत. जखमी झालेला शेतकरी हा सेनगाव येथील असून या जखमी शेतकऱ्याचे नाव मात्र समजू शकले नाही. जखमी शेतकऱ्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

लोहगडावर फिरणे पडले महागात!, पेण येथील विद्यार्थ्यांची बस ४० फूट खोल दरीत कोसळली
या बैलगाडा शर्यतीमध्ये विदर्भासह मराठवाड्यातील शंभरच्यावर बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या शेतकऱ्यांना पारितोषिक देखील ठेवण्यात आले होते.

प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या बैलजोडीस ११ हजार रुपयाचे पारितोषिक, द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या बैलजोडीस ७ हजार रुपये, तर तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या बैलजोडीस ५ हजार रुपये ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर इतर क्रमांक पटकावणाऱ्या शेतकऱ्यास प्रोत्साहनपर पारितोषिके देखील ठेवण्यात आली होती.

अमरावतीत १०० हून अधिक नागरिकांना अन्नातून विषबाधा, अचानक होऊ लागल्या उलट्या, अतिसाराचा त्रास
शंकरपटामध्ये दाखल झालेल्या बैलजोडीची बादल, बिजली, सर्जा, राजा, शंभू, लाल बादशहा, चिमण्या, लक्ष्या, हिरा, करण,अर्जुन, अशी आकर्षक नावे बघायला मिळाली. शंकरपटाच्या स्पर्धेमध्ये दाखल झालेल्या शेतकऱ्यांमध्ये हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड, उस्मानाबाद इत्यादी ठिकाणांहून, तर विदर्भातील वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यातील शेतकरी दाखल झाले होते.

शंकरपटाचे संपूर्ण नियोजन हे सेनगाव तालुक्यातल्या दाताळा बुद्रुक येथील कानिफनाथ महाराज मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकाला फी स्वरूपी १००० रुपयाची अट ठेवण्यात आली होती. याचबरोबर काही घटना घडल्यास जीविताची जबाबदारी ज्याची त्याच्यावर ठेवण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षापासून बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.परंतु आता ही बंदी सुप्रीम कोर्टाने उठवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नवा उत्साह बघायला मिळतो आहे.

मुख्यमंत्री बनण्याची हौस फिटली आणि…; महिला मुख्यमंत्री करण्यावरून चित्रा वाघ यांचा ठाकरेंवर निशाणा
बंदी उठल्यापासून बैल बाजारामध्ये चांगल्या बैलाला देखील दर मिळत आहे. बैलगाडा शर्यतीमध्ये धावणाऱ्या बैलांसाठी लाखो रुपये मोजावे लागत आहेत. याचबरोबर त्यांच्या दैनंदिन आहारासाठी शेतकरी हजारो रुपये खर्च करतात. दूध, अंडी, बदाम, काजू, सरकी पेंड, गहू, या बरोबरच इतरही महागड्या आहाराचा समावेश असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here