mother absconded with her lover: मोठ्या मुलीचं लग्न अवघ्या १० दिवसांवर आलं असताना, घरात तिच्या लग्नाची तयारी सुरू असताना आई प्रियकरासोबत पळून गेली. महिला घरात नसल्याचं लक्षात येताच कुटुंबियांनी घरात शोधाशोध केली. महिला मुलीच्या लग्नाचे दागिने आणि विवाह खर्चासाठी लागणारी रोकडदेखील घेऊन गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

घरातलं पहिलंच शुभकार्य असल्यानं अनेकांना निमंत्रणं पाठवण्यात आली. अनेकांच्या घरी पत्रिका पोहोचल्या. शनिवारी रात्री रमा अचानक बेपत्ता झाली. कुटुंबियांनी राहुलवर संशय आला. त्यांनी त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र तो फरार असल्याचं समजलं. महिलेच्या कुटुंबियांनी घरात शोधाशोध केली. तर लाखो रुपये आणि दागिने गायब असल्याचं समजलं. यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.
महिला आणि तरुण शनिवारी रात्री फरार झाल्याचं मंगलौर पोलीस ठाण्याचे एसएचओ राजीव रौथान यांनी सांगितलं. महिलेच्या मुलीचा विवाह १४ डिसेंबरला होता. तिच्या लग्नासाठीचे दागिने घेऊन महिला पसार झाल्याची माहिती रौथान यांनी दिली. महिला आणि तरुण एकाच कारखान्यात काम करायचे. दोघांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं असायचं. दोघांनी पळून लग्न केल्याचा संशय पोलिसांना आहे. दोघांचा शोध सुरू असून त्यांना लवकरच पकडण्यात येईल, असं रौथान म्हणाले.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.