पोलिसी गणवेशात फिरणाऱ्या, वाहनांची तपासणी करणाऱ्या एकाबद्दल वाहन चालकांना संशय आला. त्यांनी याबद्दल काही पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी त्या तरुणाला धरले. चौकशीत तोतया पोलिसाचे बिंग फुटले. पोलिसांनी तोतया पोलिसाला अटक केली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

cop
कोईम्बतूर: पोलिसी गणवेशात फिरणाऱ्या, वाहनांची तपासणी करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. करुमाथामपट्टी परिसरात वाहनांची तपासणी करताना पोलिसांनी तरुणाला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक म्हणून वावरणारा तरुण बोगस असल्याचं खऱ्या पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं. विशेष म्हणजे पोलीस उपनिरीक्षक असल्याची ओळख सांगूनच त्यानं विवाह केला आहे. घरातून बाहेर पडताना तरुण गणवेश परिधान करून निघायचा. यानंतर कामाला जाण्याआधी सूत गिरणीत कपडे बदलायचा.

एक जण पोलीस अधिकारी म्हणून वाहनांची तपासणी करतो. कागदपत्रांची मागणी करतो. मात्र त्याच्या हालचाली संशयास्पद वाटतात, अशी माहिती काही प्रवाशांनी पोलिसांना दिली होती. यानंतर करुमाथामपट्टी पोलिसांनी तातडीनं हालचाली सुरू केल्या. वाहनांची तपासणी करताना त्यांनी तोतयाला पोलिसाला पकडलं. कोईम्बतूर ते थिरुप्पूर मार्गावर वाहनं तपासताना बोगस पोलीस अलगद सापडला.
लेकीचं लग्न १० दिवसांवर, संपूर्ण घरात लगीनघाई; संधी साधत प्रियकरासोबत पळून गेली आई; सोबत…
पोलीस बनून फिरणाऱ्या तरुणाचं नाव सेल्वम असल्याचं चौकशीतून समोर आलं. सेल्वम सूतगिरणीत कामाला आहे. पोलीस अधिकारी बनून फिरायला आवडत असल्यानं सेल्वम गणवेश घालून वावरायचा. सेल्वमनं पोलिसी गणवेश खरेदी केला होता. तो बुलेट घेऊन परिसरात फिरायचा. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Get India news, latest marathi news headlines from all states of India. Stay updated with us to get latest India news in marathi.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here