नवी दिल्ली: दिल्ली महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दिल्लीकरांनी अरविंद केजरीवालांच्या बाजूनं स्पष्ट कौल दिलेला आहे. भाजपकडून आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना मतदारांनी भाजपला घरचा रस्ता दाखवला आहे. २००७ पासून दिल्ली महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र एक्झिट पोलचे आकडे पाहता भाजपची १५ वर्षांची सत्ता खालसा होऊ शकते.

दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी ४ डिसेंबरला मतदान झालं. सकाळी ८ पासून मतदानाला सुरुवात झाली. संध्याकाळी ५.३० वाजता ५०.४७ टक्के मतदान झालं. २०१७ मध्ये दिल्ली महापालिका निवडणुकीत ५३.५५ टक्के मतदान झालं होतं. यावेळी २५० जागांसाठी एकूण १३४९ उमेदवार रिंगणात आहेत. महापालिका निवडणुकीचा निकाल ७ डिसेंबरला म्हणजेच परवा जाहीर होतील.
पोलीस अधिकारी वाहनं तपासायचा, कागदपत्रं मागायचा; चालक कावले, धागेदारे सूतगिरणीपर्यंत गेले
इंडिया टुडे-ऍक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, आम आदमी पक्षाला १४९ ते १७१ जागा मिळू शकतात. तर भाजपची मजल ६९ ते ९१ जागांपर्यंत जाऊ शकते. काँग्रेसला केवळ ३ ते ७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अन्यांना ५ ते ९ जागा मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपला ३५ टक्के, तर केजरीवालांच्या आपला ४३ टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला १० टक्के मत मिळण्याची शक्यता आहे.

एक्झिट पोलनुसार, आपला ४६ टक्के महिलांनी मतदान केलं. तर ४० टक्के पुरुषांनी आपच्या पारड्यात मतरुपी दान टाकलं आहे. या निवडणुकीत भाजप मागे पडला आहे. भाजपला केवळ ३४ टक्के महिला मतदारांनी कौल दिला आहे. भाजपला ३६ टक्के पुरुषांनी मतदान केल्याचा अंदाज आहे.
लेकीचं लग्न १० दिवसांवर, संपूर्ण घरात लगीनघाई; संधी साधत प्रियकरासोबत पळून गेली आई; सोबत…
दिल्ली महापालिका हद्दीत येणाऱ्या मतदारांची संख्या १.४५ कोटी आहे. यातील जवळपास निम्म्यांनी मतदान हक्क बजावला नव्हता. यंदा ९५ हजार ४५८ जणांनी पहिल्यांदाच मतदान केलं. दिल्ली महापालिका देशातील मोठ्या महापालिकांपैकी एक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here