गांधीनगर: गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सत्तेत कायम राहील अशी आकडेवारी एक्झिट पोलमधून समोर आली आहे. राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसताना दिसत आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपला उत्तम लढत दिली. गुजरातमध्ये विधानसभेच्या १८२ जागा आहेत. त्यातील ९९ जागांवर भाजपनं विजय मिळवला होता. काँग्रेसला ७७ जागा जिंकण्यात यश मिळवलं. मात्र यंदा काँग्रेसला मोठा धक्का बसताना दिसत आहे.

टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार, गुजरातमध्ये भाजपला १३१ जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला ४१ जागांवर यश मिळू शकतं. अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाला ६ जागांवर यश मिळू शकेल. गुजरातमध्ये भाजपनं २००२ मध्ये १२७ जागा जिंकल्या होत्या. मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजपनं नोंदवलेला हा विक्रम यंदा मोडीत निघण्याची शक्यता आहे.
केजरीवालांचा भाजपाला दणका; दिल्ली पालिकेतील सत्ता होणार खालसा; एक्सिट पोलचे आकडे आले
आज तक-ऍक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, राज्यात भाजपला १३१ ते १५१ जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला १६ ते ३० जागा मिळू शकतात. आम आदमी पक्ष ९ ते २१ जागांवर यश मिळवू शकतो. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला मोठा धक्का बसताना दिसत आहे. काँग्रेसच्या पडझडीचा फायदा भाजपला झाला आहे. अनेक ठिकाणी आपनं काँग्रेसला धक्का देण्याची शक्यता आहे.
Exit Poll: काँग्रेसची पेन्शन, भाजपला टेन्शन; हिमाचलमध्ये कमळ कोमेजण्याचा अंदाज; पाहा आकडे
गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात ८९ जागांवर मतदान झालं. तर दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर मतदान झालं. गुजरातमध्ये ३३ जिल्हे आहेत. गेल्या निवडणुकीत पटेलांच्या आंदोलनाचा फटका भाजपला बसला. हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर, जिग्नेश मेवाणी या तरुणांच्या आंदोलनाचा मोठा परिणाम भाजपला सहन करावा लागला. मात्र यंदा पटेल आंदोलनाचा मुद्दा नाही. त्यातच आपनं गुजरातमध्ये जोर लावला. त्याचा एकूण परिणाम काँग्रेसच्या कामगिरीवर झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here